Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; बस चालक जागीच ठार

रायगड: पोलीसनामा ऑनलाइन – रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाला आहे. बस बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या चालकाचा यात जागीच मृत्यू झाला आहे. ही खाजगी बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना, बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपघातात चालक जागीच ठार झाला असून,
तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
या भीषण अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या अपघातानंतर देवदूत यंत्रणा, आयआरबी यंत्रणा,
महामार्ग वाहतूक पोलीस आणि खोपोली पोलीस घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले. जखमींवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai-Pune Expressway Accident)

Web Title :- Mumbai-Pune Expressway Accident | accident private bus and container on mumbai pune expressway bus driver was killed on spot raigad khopoli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Tips | फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान

Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे

CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती