लोणावळा ; भरधाव ट्रक पुलावरून खाली कोसळला

ADV

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई ध्रुतगती मार्गावरील वलवन एक्झिट येथे ट्रक चा अपघात पहाटे साडेसहाच्या सुमारास झाला.भरधाव वेगात असणारा कांद्याने भरलेला ट्रक मुंबई च्या दिशेने जात होता. परंतु चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने नवीन द्रुतगतिमार्गावरून तो थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कोसळला यात चालक आणि क्लीनर हे गंभीर जखमी झाले आहेत.परंतु जखमींना मदत करण्या ऐवजी नागरिकांनी कांदा पळवण्यात धन्यता मानली आहे.

सविस्तर माहिती अशी की,पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर ट्रक चा अपघात झाला.परंतु अपघात ग्रस्तांना मदत करायची सोडून नागरिक कांदा मिळेल त्या पिशवी,गोणी मध्ये भरण्यात मग्न होते.अशी माहिती लोणावळा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे.सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला.अपघात झाल्यानंतर जुना पुणे-मुंबई महामार्ग अर्ध्या तासाठी बंद ठेवण्यात आला होता.मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.या अपघाता प्रकरणी लोणावळा पोलिसांना माहिती मिळतात तातडीने घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी असलेल्या चालक आणि क्लीनर ला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.ट्रक रस्त्याच्या बाजूला करत अर्ध्या तासाने वाहून सुरळीत केली.दरम्यान अपघात झाल्यानंतर नागरिक हे कांदे घेण्यासाठी गर्दी केली होती.