‘WhatsApp’, ‘Tik Tok’ आणि ‘Bingo’ App वरून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टिकटॉक, व्हॉट्सअ‍ॅप आणि बिंगो अ‍ॅपवरून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. यात 3 मुलींची सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रेवले आणि त्यांच्या पथकानं बनावट ग्राहकांच्या मदतीनं दोन दलालांना अटक केली आहे. रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना माहिती मिळाली होती की, टोनी, गेहलोत, सूरज, राजकुमार आणि रवी मंडल हे सेक्स रॅकेट चालवतात. समाजसेवा शाखेच्या पथकानं लांडेंशी संपर्क साधला असता अशी माहिती समोर आली की, जुहूतील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवल्या जात आहेत. यात भारतीय मुलींसाठी 35 ते 40 हजार तर पाश्चिमात्या मुलींसाठी 1 ते 4 लाख रुपये घेतले जात आहेत.

समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रेवले आणि पथकानं बनवट ग्राहकाच्या मदतीनं गेहलोतशी संपर्क साधला. झेड लक्झरी रेसिडेन्सीच्या खोली क्रमांक 304 येथे मुलींना आणण्यास सांगितलं. यानंतर पथकानं छापा टाकून 3 मुलींची सुटका केली. गेहलोत आणि सुरजला ताब्यात घेतलं. यासाठी वापरली जाणारी कारही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी जुहू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी मंडल या वेश्याव्यवसायासाठी 10 ते 15 मोटार कारचा वापर करत होता. मुख्य सूत्रधार टोनी, राजकुमार, रवी हे वॉन्टेड म्हणून घोषित झाले आहेत. सदर आरोपी फाईव स्टार हॉटेलात सेक्स रॅकेट चालवत असतं. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/