‘या’ अ‍ॅप्स च्या माध्यमातून वाहनांना झालेल्या दंडाची माहिती मिळणार एका क्लिकवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक विभागाने ‘एक राज्य – एक ई-चलन’ योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत कारवाईसाठी पोलिसांना नवे अत्याधुनिक ‘ई-चलन’ मशिन देण्यात आले आहे. गृहविभागाने ३२ जिल्ह्यांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी Mumbai Traffic App तयार करून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.

दंडाची माहिती एका क्लीक वर उपलब्ध
या योजनेची प्रभावी सुरवात Mumbai Traffic App आणि Maha Traffic App च्या माध्यमातून ई-चलन ची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना चलनाची माहिती मिळणे किंवा लागलेला दंड भरणे या अँप्स मुळे अधिक सोईस्कर झाले आहे.

वाहतुकीच्या नियमांचा भंग करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना राज्य वाहतूक पोलिसांकडून राज्यभरात एकच यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यात राज्यातील सर्व शहरे एकाच यंत्रणेखाली जोडण्यात येणार आहेत. यामाध्यमातून डिजिटल चलनाद्वारे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. हे दोन्ही अँप्स गूगल प्ले स्टोर वर उपलब्ब्ध आहेत. याचा वापर करून आपण आपल्या वाहनाची नोंदणी करून वाहनाला आकारले गेलेले सर्व दंड आपण पाहू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त