मनपातील ‘त्या’ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेतील माळीवाडा प्रभाग समितीतील लिपिक टंकलेखकला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. रजा मंजूर न करता परस्पर रजेवर गेल्याने आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या मंजुरीनंतर सदर कारवाई करण्यात आली आहे.

मनपाच्या माळीवाडा प्रभाग कार्यालयाती लिपिक टंकलेखक विद्याधर सिताराम कुकडे असे कारवाई झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. ९ एप्रिल २०११ पासून कोणतीही रजा मंजुरी न घेता ते परस्पर रजेवर गेले होते. २०१३ मध्ये त्यांच्यावर चौकशी प्रस्तावित करण्यात आल्यानंतर त्यांनी कामावर रुजू करुन घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना कामावर रुजुही करुन घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ते गैरहजर आहेत.

कुकडे यांना नोकरीची गरज नसल्याचे निदर्शनास येत असून कार्यालयीन शिस्तीचा त्यांनी भंग केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मनपा अधिनियमातील कलम ५६ (२)(ग) नुसार त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी बजावलेल्या आदेशात म्हटले आहे.

You might also like