२० हजाराची लाच घेताना ‘तो’ नगराध्यक्ष अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – स्थापत्य अभियंत्यांचा पगार काढून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना वाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

प्रेमनाथ आत्माराम झाडे (वय ४९ वर्षे, पद नगराध्यक्ष, नगर परीषद वाडी, जिल्हा. नागपूर) असे पकडलेल्या नगराध्यक्षाचे नाव आहे.

तक्रारदार यांची संस्था आहे. या संस्थेकडून नगपरिषदेला ३ स्थापत्य अभियंते पुरविण्यात आले होते. त्या स्थापत्य अभियंत्यांचा मागील ४ महिन्यांचा पगार काढून दिल्याबद्दल त्याचा मोबदला म्हणून झाडे यांनी त्यांना २४ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती २० हजार रुपयांवर तयार झाले. त्यानंतर त्यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने याची पडताळणी केली. त्यावेळी त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्लवार, पोलीस उपअधिक्षक विजय माहुलकर, महेश चाटे पोलिस उपअधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी कर्मचारी सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राउत, शेखर देशकर , सुनिल हुकरे चापोशी दिनेश धार्मिक यांच्या पथकाने केली.