Murbad News | नरकयातना भोगत असलेल्या रस्त्या करीता तरुणांनी उगारले आंदोलनाचे ‘हत्यार’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – Murbad News | माळशेज हायवेला (Malshej Highway) लागून असलेला नढई-नारिवली रस्ता चोरीला गेला की काय असा प्रश्न रस्त्या लगत असलेल्या गावकऱ्यांना व प्रवाश्यांना पडला आहे. याचे स्थानिक कार्यकर्त्यांना आणि प्रशासनाला काहीही पडले नाही. या रस्त्यावर अनेक भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांनी (Murbad News) पुढाकार घेऊन रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना करून झोपलेल्या प्रशासनला (administration) जाग करण्याचं काम केलं आहे.

 

नढई – नारिवली रस्त्या लगत स्वस्तिक स्टोन क्रेशर (Swastika Stone Crusher) कंपनीच्या अवजड डंपर वाहतुकीने गेल्या दोन वर्षात नढई – नारिवली रसत्याची चाळणं झाली असून जणूकाही हा रस्ता नरक यातना भोगत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाश्यांना व वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून जावं लागत असून या रस्त्यावर कित्येक भीषण अपघात (terrible accident) झाले आहेत. कित्येक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी तर वाहनचालकांना हा रस्ता जातो कुठे असा प्रश्न पडतो. अगोदरच अरुंद असणाऱ्या रस्त्यामुळे वाहनचालकांना जिवावर बेतून प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात अनेक जागरुक नागरिकांनी, पत्रकारांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने स्टोन क्रेशर विरोधात व पडलेल्या खड्यांविरोधात कोणतीही कारवाई केली (Murbad News) नाही.

भुवन येथे झालेल्या सभेमध्ये परिसरातील नागरिक व प्रवासी यांच्या सुरक्षेचा विचार करता या परिसरातील भुवन,
दहिगाव, जामघर, शेलारी, म्हाडस, बांधिवली, नारिवली, देहरी येथिल ग्रामपंचायत सरपंच व काही तरुण,
पत्रकार एकत्र येऊन ‘नढई-नारिवली रस्ता संघर्ष समिती’ची स्थापना केली आहे.
प्रशासनाचा निषेध म्हणुन यावेळी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन समितीची स्थापना केली.
यावेळी प्रशासनाचा निषेध करून यापुढे या रसत्याच्या संदर्भात सर्व निर्णय,
पुढील आंदोलनाची दिशा संघर्ष समितीच्या माध्यमातून ठरविली जाईल असे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले (Murbad News)आहे.

 

Web Title :- Murbad News | youth protest for the roads

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation GB | नधिकृत केबल शोधण्यापूर्वी केबल कंपन्यांना नोटीस पाठवून ‘डिक्लेरेशन’ मागवणार – महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी

Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या किंमतीत ‘तेजी’, जाणून घ्या आजचा नवीन दर