नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपीवर पुण्यात दाखल होता खुनाचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत याला मदत करणाऱ्या सुधन्वा गोंधळेकर याला अटक केली आहे. त्याच्याकडून आज मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सुधन्वा गोंधळेकर याच्यावर २००० साली पुण्यात खुनाचा दाखल करण्यात आला होता. आणि या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e194a18a-9d87-11e8-bb90-978fafb12ceb’]
गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता. या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकर्णी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याचा १५ सप्टेंबर २००३ रोजी निकाल लागला असून त्यातून दोघांची पुराव्या अभावी निर्दौष मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान, एटीएसने सुधन्वा गोंधळेकर याच्याकडून शनिवारी मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे.

संबधित बातमी
नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा जप्त