खुनाच्या गुन्ह्यात फरार गुन्हेगारास बारा वर्षानंतर अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बारा वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसासह अटक केली.

दत्ता एकनाथ लोणकर (35, रा. लांडेवाडी, विठ्ठलनगर झोपडपट्टी, शिवसेना चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने मंगळवारी आळंदी येथून प्रस्थान ठेवले. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पालखी सोहळ्यात चोख बंदोबस्त ठेवला. गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम तयार करून पालखी सोहळ्यात चोरी आणि पाकीट चोरीचे प्रकार घडू नये, यावर नियंत्रण ठेवले जात होते.

देहूफाटा येथे गुन्हे शाखेच्या पथकाला एक संशयित इसम पोलिसांना पाहून पळून जाताना दिसला. त्याबाबत अधिक संशय आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली.

दत्ता लोणकर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले. भोसरी येथील नंदू लांडे यांच्या खुनामध्ये दत्ता लोणकर हाच साक्षीदार होता तर, बबलू शेख हा त्या खुनातील आरोपी होता. दत्ता लोणकर याने न्यायालयात बबलू शेख विरोधात साक्ष देऊ नये म्हणून बबलू त्यास वारंवार दमदाटी करत होता. यावरून दत्ता लोणकर याने त्याचे साथीदार लक्ष्मीकांत गालफाडे, संजय जाधव, अमजर बाकरा, योगेश जाधव यांच्यासोबत मिळून 2007 साली बबलू शेख याचा खून केला.

ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, प्रमोद लांडे, सचिन उगले, महेंद्र तातळे, प्रवीण पाटील, मनोजकुमार कमले, गणेश सावंत, गणेश मालुसरे, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक

Loading...
You might also like