दगडाने ठेचून तरुणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात दगड मारुन जखमी करुन खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मुफस्सिर ऊर्फ आझीम जकिउद्दीन काझी (वय २८) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने काझी याचा झोपेतच मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. संदीप अशोक गौंड (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत सचिन गौतम भोसले (वय ३८, रा. आदर्शनगर, समर्थ कॉलनी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन भोसले, संदीप गौंड, मुफस्सिर काझी आणि दिनेश मंडोठिया हे मित्र आहेत. १० जून रोजी त्यांच्यात भांडणे झाली होती. पण, ती त्याच वेळी मिटविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ जूनला रात्री १० वाजता मोशीतील आदर्शनगर येथील धमेंद्र चव्हाण यांच्या घरासमोर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा संदीप गौंड याने काझी याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. तो किरकोळ जखमी झाला होता. यानंतर काझी हा घरी जाऊन झोपला. रात्री ११ वाजता झोपलेला काझी हा दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ जूनला दुपारी ३ वाजले तरी उठला नाही़ म्हणून घरातील लोकांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणतीही हालचाल करीत नसल्याचे पाहून त्याच्या नातेवाईकांनी त्याला वायसीएम रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

डोक्यात मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन काझी याचा मृत्यु झाल्याने भोसरी पोलिसांनी संदीप गौंडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा
मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

 

Loading...
You might also like