Murder News | घंटागाडी चालकाचा मित्रानं गुप्तीनं अन् दगडानं ठेचून केला निर्घृण खून

कराड : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – दारु (Alcohol) पिताना झालेल्या वादातून एका तरुणानं आपल्याच मित्राचा निर्घृण खून (Murder News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मित्राने घंटागाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या मित्रावर गुप्तीनं सपासप वार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याचे दगडाने डोकं ठेचलं (Crushed head with Stone). या घटनेनंतर मृत तरुणाच्या भावाने कराड पोलीस ठाण्यात (Karad police station) तक्रार दाखल केली. याप्रकरणी कराड पोलीस ठाण्यात (Karad police station) आरोपी मित्रावर (accused friend) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल (FIR Lodged) केला असून आरोपी फरार झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जेवण करुन घराबाहेर पडला अन्
किरण मुकुंद लादे Kiran Mukund Lade (वय-21 रा. बुधवार पेठ, कराड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. किरण लादे हा कराड महापालिकेच्या (Karad Municipal Corporation) घंटागाडीवर चालक (Driver) म्हणून काम करतो. शुक्रवारी सकाळी किरण नेहमीप्रमाणे घंटागाडीवर कामाला गेला होता. दुपारी कामावरुन घरी आल्यानंतर जेवण करुन तो पुन्हा घराबाहेर पडला. मात्र तो घरी परतलाच नाही.

रस्त्याच्या कडेला आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
किरण रात्री उशीरापर्यंत घरी आला नाही. नातेवाईकांनी (Relatives) त्याच्या मोबाईलवर (mobile) संपर्क (Contact) साधला. परंतु फोन बंद लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला. पण तो सापडला नाही. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास चौडेश्वरीनगर-गोवारे (Chaudeshwarinagar-Goware) येथील पुलाच्या पश्चिमेस ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला किरणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

शरीरावर सपासप वार केल्याच्या जखमा
किरणच्या डोक्यात आणि कपाळावर अनेक खोल जखमा होत्या. त्याच्या डोक्यात दगडानं जोरदार वार केल्याने या जखमा झाल्या होत्या. रात्रभर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कराड पोलीस ठाण्यातील (Karad police station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

दारु पिताना झालेल्या वादातून खून
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये, किरण शुक्रवारी रात्री त्याचा मित्र आकाश गवळी (Akash Gavli) याच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. दारु पित असताना दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला असावा, यातून आकाशनं किरणचा खून केला असावा, अशी शक्यता कराड पोलिसांनी (Karad police) वर्तवली आहे.
किरणचा खून केल्यानंतर आरोपी आकाश गवळी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Titel :- murder news in karad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर