मिरजेत गळा चिरुन डोक्यात दगड घालून तरुणाचा खुन

मिरज : रेल्वे कर्मचारी वसाहतीजवळील समतानगर येथे तरुणाचा गळा चिरुन डोक्यात दगड घालून खुन करण्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. गोविंदा मुत्तीकोळ (वय ४०, रा. रेल्वे कर्मचारी वसाहत, मिरज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ सेवन करणार्‍या मित्रांबरोबर झालेल्या वादातून हा खुन झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गोविंदाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे.

गोविंदा याला अंमली पदार्थाचे व्यसन होते. तो आई समवेत समतानगर येथे रहात होता. समतानगर येथील जुन्या हरिपूर रस्त्यावर दोन ते तीन जणांनी गोविंदाचा गळा चिरुन त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केल्या आढळून आले. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

गोविंदा याच्यासमवेत रात्री त्याच्या अंमली पदार्थाचे व्यसन करणार्‍या मित्रांसोबत भांडणे झाली असावीत. त्यातून त्याचा खुन करण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे.