उत्तरप्रदेशात भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या कार्यक्रमात ‘अफरातफरी’, करंगळीला ‘फ्रॅक्चर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह मुजफ्फरनगर मधील एका कार्यक्रमादरम्यान जखमी झाले. यात त्याच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी शहरातील रुग्णालयात दाखल केले असून तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या बोटाची शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांना दाखल केलेल्या वर्धमान रुग्णालयाच्या बाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

स्वतंत्र देव पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी आहेत. कार्यकर्त्या पासून संगठनकर्त्यापर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे. उत्तरप्रदेशातील लोकसभा निवडणूकीसाठी काढण्यात आलेल्य सर्व रॅली यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचा वाटा होता. स्वतंत्र देव सिंह हे एक निष्णात संघठनकर्ता म्हणून ओळखले जातात.
विधानसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांची रॅली यशस्वीपणे पार पडण्यासाठी ते स्वतः त्या शहरात जाऊन काम करत असत. त्यांच्याकडे मतदान केंद्रापासून ते मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंतची सर्व माहिती असते.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like