Coronavirus : दक्षिण कोरियातील एका वरिष्ठ नेत्याला ‘कोरोना’ संसर्गाचा फैलाव केल्याप्रकरणी अटक

सेऊल : पोलीसनामा ऑनलाइन –  दक्षिण कोरियातील एका वरिष्ठ नेत्याला फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान एका चर्चच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा फैलाव केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाय योजनांमध्ये अडथळे आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

दक्षिण कोरियातील ही चर्च कोरोना संसर्गाचे मुख्य ठिकाण झाले होते. देशातील १४ हजार ३३६ कोरोना संसर्गित रुग्णांपैकी जवळपास ५२०० प्रकरणे या चर्चशी संबंधित आहेत. या चर्चमध्ये येणाऱ्या लोकांमुळे कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्याचं प्रशासनाने सांगितलं. त्यानंतर देशाच्या इतर भागात सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं प्रशासनाने म्हटलं.

याप्रकरणी मध्य सुवाआन शहरातील शिनचियोंजी चर्चचे अध्यक्ष ली मॅन-ही यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यांनी चर्चमध्ये काही नागरिकांना लपवून ठेवून खोटी माहिती देऊन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पथकाची दिशाभूल केल्याचं आरोप करण्यात आला. अखेर जिल्हा न्यायालयाने ली यांच्या अटकेचे आदेश दिले. मात्र, ली आणि चर्चने प्रशासनाचे सर्व आरोप फेटाळून लावत, आपण प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केल्याचं म्हटलं आहे. तर न्यायालयासमोर सत्य समोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं चर्चचे प्रवक्ते किम यंग-उन म्हणाले.

शिन्जेऑन्जी चर्चची स्थापना १९८४ मध्ये केली होती. कोरियन भाषेत शिन्जेऑन्जीचा अर्थ ‘नवीन स्वर्ग आणि पृथ्वी’ असा होतो. या चर्चचे प्रमुख स्वतःला येशूचा अवतार समजतात. ली हे त्यांच्यासोबत एक लाख ४४ हजार नागरिकांना स्वर्गात घेऊन जाणार असल्याचा दावा त्यांच्या अनुयायांनी केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like