कोयत्याने सपासप वार करून सिक्युरिटी गार्डकडून सुपरवायझरचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ड्युटी देण्यावरून झालेल्या वादातून कोयत्याने सपासप वार करुन सिक्युरिटी गार्डने सुपरवायझरचा खून केला. एमआयडीसी परिसरात आज ही घटना घडली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राजाभाऊ नामदेव वाघमारे हे मयताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी किरण रामभाऊ लोमटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबााबत माहिती अशी की, सिक्युरिटी गार्ड लोमटे व सुपरवायझर वाघमारे यांच्यात सकाळी ड्युटी देण्यावरून किरकोळ स्वरूपाचे वाद झाले होते. सुरुवातीला गार्ड लोमटे हा तेथून निघून गेला. अकरा वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा सिक्युरिटी एजन्सीच्या कार्यालयात आला. आल्यानंतर त्याने खुर्चीवर बसून काम करीत असलेल्या वाघमारे यांच्यावर सपासप वार केले. त्यात वाघमारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

डॉक्टरांनी वाघमाारे यांना मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like