अहमदनगर : डोक्यात सिमेंटचा खांब घालून दोन वर्षाच्या चिमुरड्याचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात दोन वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सिमेंटचा खांब घालून त्याचा खून करण्यात आला. आज दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे ही खळबळजनक घटना घडली. गणेश काळकुशा काळे हे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नाना आघाव, नाना आघाव यांचा मुलगा (नाव माहित नाही), विष्णु आघाव व विष्णू आघाव याचा मुलगा (नाव माहीत नाही) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आज दुपारी अडीच वाजता सौ. जमा काळे ही शेतात काम करीत असताना पती काळकुशा तेथे आले. त्यावेळी मुलगा गणेश हा त्यांच्या खांद्यावर बसला होता. त्यांच्या शेतजमीनीची नाना आघाव याने परस्पर मोजणी करुन घेतली होती. जमीनीचा ताबा घेवुन त्याचे लोक जमीनीत खांब लावत होते. काळे दांपत्य नाना आघाव याच्या शेताकडे जाण्याच्या तयारीत असताना नाना आघाव हाच काळे यांच्या जमीनीकडे येताना दिसला. त्याचे सोबत त्याचा भाऊ विष्णु आघाव व विष्णु याचा मुलगा तसेच नाना आघाव याचा मुलगा (नाव माहीत नाही) हे आले. त्यावेळी त्यांच्या हातात सिमेटंचे पोल होते. नाना आघाव त्याच्या सोबतच्या लोकांना म्हणाला की, ‘यांचा जमीनीत काही संबंध नाही. यांना मारुन टाका’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिलाय, असे म्हणून त्यांनी त्याचे हातातील सिंमेट पोलने मारायला सुरुवात केली.

त्यावेळी कमल सोल्या काळे, सोळया काळे, नंदाबाई काळे, चंदा सोल्या काळे व इतर नातेवाईक जमू लागले. काळकुशा काळे यांना नाना आघाव सिमेंट पोलने मारीत होते. त्यावेळी काळकुळा यांच्या खांद्यावर असलेला मुलगा गणेश याच्याकडे धावून जात नाना आघाव याने दोन वर्षांच्या गणेश याच्या डोक्यावर सिमेटच्या पोलने जोराचा फटका मारला. तेव्हा मुलगा खांद्यावरुन खाली पडून बेशुद्ध पडला. ‘मी त्यांना आम्हाला मारु नका, आमच्या सगळया जमीनी तुम्ही घ्या’, असे ओरडत असताना त्यांनी काही ऐकून न घेता नाना आघाव व इतर त्याचे सोबतच्या लोकांनी पती काळकुशा यास सिमेटेंच्या पोलने मारु लागले. त्यावेळी मुलगा गणेश यास मार लागला असल्याने व नाना आघाव व त्याचे साथीदार हे काही ऐकत नसल्याने व ते दिसेल त्या सिमेंटच्या पोलने मारु लागले.

गणेश याला घेवुन जमा काळे या उपचासाठी सरकारी दवाखाना श्रीगोंदा येथे आणले. डॉक्टरांनी तो मयत झाला असल्याचे सांगितले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like