आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाकडून खून

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – वाठोड्यातील अबुमियानगर भागात रविवारी रात्री दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला धाकट्याने मित्रांच्या मदतीने संपविले. ही थरारक घटना होळीच्या आदल्या दिवशी घडली आहे. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे .

शुभम गुरुदेवप्रसाद जैस्वाल (वय २४) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे तर विक्‍की गुरुदेवप्रसाद जैस्वाल (वय २६) असे मृताचे नाव आहे. विक्की रोज दारू पिऊन आईला मारहाण करायचा. रविवारी रात्री ही तसेच काही झाले. विक्की हा रविवारी रात्री दारू पिऊन आला. त्याने आईसोबत वाद घालून मारहाण करत चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी शुभम आणि त्याचे तीन मित्र गच्चीवर दारू पित होते. खाली येऊन विक्कीला समजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला विक्कीने चाकूने मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शुभमच्या मित्रांनी विक्कीला पकडले. शुभमने विक्कीच्या हातातील चाकू हिसकावत त्याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. जखमी होऊन घटनास्थळीच विक्कीचा मृत्यू झाला. शुभम व त्याचे मित्र तेथून पसार झाले. एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने वाठोडा पोलिसांना कळविले. सोमवारी दुपारी पोलिसांनी शुभम याला अटक केली. शुभम ने पोलिसाना सांगितल्यानुसार, विक्‍की गुरुदेवप्रसाद जैस्वाल हा दारू पिऊन आईला त्रास देत असल्यानेच विक्की याची हत्या केल्याचा कबुल केलं.

पोलिसांकडून मदत मिळाली नाही

वाठोडा पोलिसांत रक्षिका यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा तक्रार केली. रक्षिका याना तो ठार मारण्याची धमकी देतो, नेहमी त्याच्याकडे चाकू असतो असे रक्षिका यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कारवाई न करता तिला भरोसा सेलमध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला. भरोसा सेलनेही विक्कीला केवळ सूचना दिली. कारवाई केलीच नाही.असे नातेवाईकांनी म्हणाले.