पोलिसांचा खबऱ्या लग्नासाठी बनला ‘रॉ’चा एजंट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – बोलण्यात तो चतुर आहे. तो इंग्रजीसह आठ भाषांचा जाणकार आहे. त्याच्या बोलण्याने कोणीही सहजपणे प्रभावित होऊ शकतो, यामुळेच महिला व तिचे कुटुंबीयसुद्धा प्रभावित झाले. मात्र, लग्नासाठी तो महिलेच्या घरी राहिला आणि त्याच्या एकंदर व्यवहाराविषयी त्यांना संशय आला. तेव्हा आपला रुबाब दाखविण्यासाठी तो स्वत: पोलीस ठाण्यात चालत गेला. त्याच्या बोलण्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावून गेले होते. पण, जास्तच इम्प्रेशन मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपण ‘रॉ’ चा एजंट असल्याचे सांगितले. पण, अधिक चौकशीत तो मुंबई पोलिसांचा खबऱ्या असल्याचे उघडकीस आले.

इमरान खान नूर मोहम्मद खान (वय ३९, रा़ शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) याला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, इमरान हा मुंबई पोलिसांचा खबरी म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. तो घटस्फोटित आहे. दोन महिन्यापूर्वी येथील एका ३५ वर्षाच्या महिलेसोबत त्याची ओळख झाली. तेव्हा त्याने स्वत:ची ओळख ‘रॉ’ चा एजंट अशी करुन दिली. इमरानने तिला लग्नाची मागणी घातली. महिलेनेही ते मान्य केली. तो तिला भेटायला १५ दिवसांपूर्वी नागपूरला आला.

या महिलेच्याच घरी राहू लागला. आपल्या बोलण्याचे त्याने या महिलेच्या कुटुंबीयांवरही इम्प्रेशन पाडले. मात्र, या १५ दिवसात त्याने वेगवेगळी कारणे सांगून या महिलेकडून ३० हजार रुपये घेतले. त्यावरुन तिला संशय आला व तिने त्याच्या आईवडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, आईवडिलांचा मृत्यु झाला असून आपण एकटाच असल्याने त्याने सांगितले. पण तिचा विश्वास न बसल्याने तिने त्याच्याकडे ‘रॉ’ चे ओळखपत्र पहायला मागितले. पण ते तो दाखवू शकला नाही. त्यातून तिला त्याच्याविषयी आणखीनच संशय येऊ लागला. तेव्हा इमरान हा स्वत: गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेला. त्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनाही फोन केला. आपण ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून लग्नासाठी मदत करण्यास सांगितले.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी गिट्टीखदान पोलिसांशी संपर्क केला. त्यामुळे पोलीस इमरानला घेऊन ठाण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोनमुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचा ‘रॉ’ शी कोणताही संबंध नसल्याचे आढळून आले. महिलेवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने हा सर्व बनाव केला असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सिनेजगत

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

 

You might also like