Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्येही सख्ख्या बहिणींनी जपली माणुसकी, कृत्याला ‘सलाम’ !

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळीपासून घरेदारे बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे अनेक मुक्या जनावरांचे हाल होत आहेत. अशाही परिस्थितीत नागपुरातल्या दोन बहिणींनी लॉकडाउन मधली माणुसकी जपली आहे. मास्क लावून आणि हातात अन्न घेऊन बाहेर पडल्या आहेत. रस्त्यावर भटकणारे कुत्रे उपाशी मरु नयेत यासाठी या दोघीजणीही या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत आहेत.

लॉकडाउनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. या लॉकडाउनमध्ये लोक बाहेर पडणे टाळत आहेत. अशात नागपूरमध्ये दोन बहिणी अशा आहेत ज्या मास्क लावून आणि हातात अन्न घेऊन बाहेर पडल्या आहेत. रस्त्यावर भटकणारे कुत्रे उपाशी मरु नयेत यासाठी या दोघीजणीही या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत आहेत. काजल आणि दिशा अशी या दोन बहिणींची नावे आहेत. दोघीही भटक्या कुत्र्यांना अन्न मिळावे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत. लॉकडाउनमुळे लोकांनी घराबाहेर येणे टाळले आहे.

अशात रस्त्यावर भटकणारे कुत्रे हे अन्नाच्या शोधात वणवण करत आहेत. त्यांना अन्न मिळावे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना खाऊ घालतो आहोत असे या दोन बहिणींनी सांगितले. सध्या देशात, राज्यात एका संकटाला आपण सामोरे जात आहोत. अशावेळी मुक्या प्राण्यांची उपासमार होणे आपण कसे पाहायचे? अशा कठीण प्रसंगात आपण त्यांना एकटे सोडून, उपाशी मरण्यासाठी सोडून चालणार नाही. असेही या दोन बहिणींनी सांगितले आहे.