विवाहीता नको त्या अवस्थेत प्रियकरासह ‘बेड’वर, नवरा ऐनवेळी ‘टपकला’ अन् ‘लव्हर’ नग्नावस्थेत ‘लटकला’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियावर कधी काय पोस्ट केलं जाईल हे सांगता येत नाही. आता एक असा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे, ज्यात प्रेयसीचा पती अचानक घरी आल्याने प्रियकराला प्रेयसीच्या घरातून बाहेर पडताना पळता भूई थोडी झाली. त्या प्रियकाराने नग्नावस्थेत थेट चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारली. खिडकीतून पळ काढणाऱ्या प्रियकराचा खिडकीला विवस्त्र लटकेला व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय.

फक्त 10 सेंकदाच्या हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. या व्हिडिओमध्ये दिसते की, एक विवस्त्र व्यक्ती एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीला लटकलेला आहे. काही वेळ तो पकडून लटकून राहण्याचा प्रयत्न करतो परंतू अखेर दणकण खाली आदळतो. या व्यक्तीचे एका विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तो तिला भेटण्यासाठी घरी गेला होता. दोघे नको त्या अवस्थेत असताना अचानक महिलेचा पती घरी आला.

पंचाईत झालेले दोघे चांगलेच घाबरले. अखेर प्रियकराने खिडकीतून पळून जाण्याचा निर्णय घेतला. तो खिडकीत लटकला देखील परंतू पकड सैल झाल्याने तो इमारतीखाली असलेल्या कचऱ्यांच्या डब्यावर दणकण आदळला. जमीनवर आदल्याने तो जखमी झाला परंतू त्याचा जीव मात्र वाचला.

एका वृत्तानुसार, संबंधित व्हिडिओ चीनमधील आहे. 30 नोव्हेंबरला हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला. तेव्हापासून फजिती झालेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आता नेटिझन्स यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Visit : policenama.com

 

You might also like