पिंपरी मतदार संघातील चार हजार ६४५ मतदारांची नावे वगळणार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

स्थलांतरित, दुबार, मयत असणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या ३९९ यादी भागामधील   सुमारे चार हजार ६४५ मतदार वगळण्यास पात्र असल्याने त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95ab9ffe-bc92-11e8-9c8d-8d6d06b64f0b’]

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या १० मे २०१८ नुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानूसार २०६ पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण ३९९ यादी भागातील स्थलांतरित, दुबार, मयत मतदारांची वगळणीचे काम सुरु आहे. हे काम मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून सुरु आहे. स्थलांतरित, दुबार सर्व मतदारांना नोटीस बजाविण्यात आल्या असून प्राप्त पंचनामे यांची छाननी करुन पहिल्या टप्प्यात यादीनूसार चार हजार ६४५ मतदार वगळणीस पात्र आहेत.

कॅम्पमधील पंचताराकिंत हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

याबाबत त्या मतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तिन्हीही वेबसाईटवर अवलोकनार्थ ठेवले आहे. या वगळणी कार्यक्रमाचा व्यापक प्रसिध्दीचा भाग म्हणून प्रस्तावित वगळणी करण्यात येणारे मतदारांची यादी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवले आहे.

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला मारहाण

[amazon_link asins=’B0756Z43QS,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53abc377-bc93-11e8-9684-f3a0c4c8f80a’]