Nana Patekar-Ajit Pawar | नाना पाटेकरांनी घेतली अजितदादांची भेट; कौतुक करत म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patekar-Ajit Pawar | अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे तोंडभरून कोतुक केलं आहे. ”अजित पवार ज्या पद्धतीने काम करतात ते आपल्या कामाची कधीच जाहिरात करत नाहीत. ते आपलं काम करत राहतात. त्यांची एखादी चुकीची गोष्ट तेवढीच अधोरेखित होत राहते. त्यांनी केलेलं काम हे समोर यायला पाहिजे. ते एक चांगला नेता आहेत.” असं नाना पाटेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. (Nana Patekar-Ajit Pawar)

 

आज (शनिवारी) नाना पाटेकर यांनी पुण्यातील (Pune News) सर्किट हाऊस येथे अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना  अजित पवार यांच्यावर कौतुकाची स्तुतीसुमने उधळली आहेत. ”राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही.
आम्ही अगदी छोटसं काम जरी केलं तरी तुम्ही खूप मोठं दाखवता आणि सरकारने केलेल्या कामाची किंमत राहत नाही हे असे असता कामा नये.
विरोधी पक्षाला देखील आपणच निवडून दिलेले आहे. जोपर्यंत निवडणूक आहेत तोपर्यंत विरोध योग्य आहे.
परंतु एकदा तुम्ही संसदेत, विधानसभेत गेल्यानंतर त्याचे पावित्र्य पाळायला पाहिजे.”
असं नाना म्हणाले. (Nana Patekar-Ajit Pawar)

पुढे नाना पाटेकर म्हणाले, ”मला असं वाटतं पक्ष बदलणाऱ्या माणसाला 5 वर्ष कोणीही तिकीट देऊ, मग पहा नका कुणीही पक्ष बदलणार नाही.
तिथे काहीतरी नियम असायलाच पाहिजे. निवडणूक लढवण्यासाठी किमान शिक्षणाची अट असायलाच पाहिजे.
मला नोकरीला जायचं असेल तर तिथे शिक्षणाची आणि वयाची अट आहे. शासकीय अधिकारी हे सर्व शिक्षित आहेत.
पण, अभिनयाच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात वयाची आणि शिक्षणाची अट नाही.”

 

Web Title :- Nana Patekar-Ajit Pawar | nana patekar meet ajit pawar in pune said he is a good leader

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पिंपरी-चिंचवड परिसरातील संतापजनक घटना ! टीव्हीचा आवाज वाढवून 12 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक अत्याचार; नराधम जेरबंद

 

Fire Kamala Building Tardeo Mumbai | मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली इमारतीला आग; 7 जणांचा मृत्यू तर 15 जखमी

 

Sushant Singh Rajput | सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण श्वेताने शेअर केली एक भावूक पोस्ट, व्हिडिओ पाहून चाहते देखील झाले भावूक