Pune Crime | पिंपरी-चिंचवड परिसरातील संतापजनक घटना ! टीव्हीचा आवाज वाढवून 12 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक अत्याचार; नराधम जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी-चिंचवड परिसरातील (Pimpri-Chinchwad) म्हाळुंगे येथील एक संतापजनक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. पत्नी कामावर गेली असताना भाजी बनवण्यासाठी 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलवून घरातील टीव्हीचा आवाज मोठ्याने करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Act) केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. योगेश साहेबराव चाटी (Yogesh Sahebrao Chati) (वय, 31) असं अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेशची पत्नी कामावर गेल्यानंतर ओळखीच्या गरीब घरातील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात कोणी नाही, भाजी बनवण्यासाठी ये अशी थाप मारली. आणि घरात बोलावले. यानंतर योगेशने तिच्यावर बळजबरी करत अनैसर्गिक अत्याचार केले. गंभीर बाब म्हणजे अत्याचार करताना पीडितेचा आवाज घराबाहेर जाऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठ्या प्रमाणात ठेवला होता. अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार (Police Inspector Arvind Pawar) यांनी दिली. (Pune Crime)

 

या प्रकारानंतर पीडित मुलगी घरी गेली आणि घडलेला सर्व प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला. यानंतर संबंधित आरोपी योगेश विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्याला अटक (Arrested) केली आहे. या प्रकरणी अधिक तपास अरविंद जाधव (Arvind Jadhav) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | minor girl raped by neighbour in pimpri chinchwad of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा