Nana Patekar | नाना पाटेकरांचे ओटीटी विश्वात पदार्पण; दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर ‘या’ वेबसीरीजमध्ये करणार काम

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मध्यंतरीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी रोखठोक चर्चा करणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) चर्चेत होते. आपल्या अभिनयाने त्यांनी आजवर अनेक लोकांची मने जिंकली आहेत. सध्या एवढेच नाही तर नाना पाटेकर हे स्वतः जेवण बनवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर कित्येकदा शेअर केले आहेत. या व्हिडिओज देखील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या आगामी चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) झळकणार आहेत. एवढेच नाही तर एक मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक मध्ये देखील नाना पाटेकर दिसणार आहेत.

 

आता ओटीटी (OTT) माध्यम हे अनेकांच्या आवडीचे माध्यम झाले आहे. अनेक अभिनेता अभिनेत्री यामध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. सध्या नाना पाटेकर देखील अशाच एका वेब सिरीज मधून ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. नाना पाटेकर दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या ‘लालबत्ती’ (Lal Batti) या वेब सिरीजमध्ये पडद्यावर झळकणार आहेत. याआधी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर नाना पाटेकरांनी ‘अपहरण’ (Apharan), ‘राजनीती’ (Raajneeti) चित्रपट केले होते. मिळालेल्या माहितीनुसार ‘लालबत्ती या वेब सिरीज मध्ये मेघना मलिक (Meghna Malik) ही अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी मेघनाने ‘मिर्जापुर’ (Mirzapur), ‘अरण्यक’ (Aranyak) आणि ‘बंदिश बॅंडिट्स’ (Bandish Bandits) यासारख्या वेब सिरीज मध्ये देखील काम केले होते. लालबत्ती हि वेब सिरीज राजकारणावर आधारित असणार आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आजवर ‘गंगाजल’ (Gangajal), ‘मृत्युदंड’ (Mrityudand), ‘अपहरण’ (Apharan),
आणि ‘चक्रव्यू’ (Chakravyuh) सारखे हिट चित्रपट बनवले आहेत. तर सध्या त्यांची ‘आश्रम’ (Aashram)
हि वेब सिरीज चांगलीच गाजत आहे. ‘गंगाजल 2’ (Gangajal -2), ‘सांड की आंख’ (Saand Ki Aankh) सारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला आहे.

 

Web Title :- Nana Patekar | nana patekar will debut in web series laal battee direction of prakash jha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?