Nana Patekar On Ajit Pawar And Hasan Mushrif | नाना पाटेकरांची कोल्हापूरात जोरदार बॅटिंग; म्हणाले – ‘अजितदादा खूप बदलले अन् मुश्रीफ ‘मर्फी बॉय’सारखे गोंडस’

कोल्हापूर / कागल : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patekar On Ajit Pawar And Hasan Mushrif | अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामधील मैत्री संपूर्ण राज्याला माहित आहे. याचाच प्रत्यय कोल्हापूरात (Kolhapur) पुन्हा एकदा पहायला मिळाला. कागल येथील एका कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांना अजित पवारांची (Ajitdada) आठवण झाली आणि त्यांनी तोंडभरुन कौतुक केलं. ‘अजित आता खूप बदलला आहे. तो बोलताना आता खूप विचार करुन बोलतो. प्रत्येक शब्द जपून वापरतो. कुणाला दरडवायचं असेल तर विचारपूर्वक दरडावतो’ असे नाना पाटेकर म्हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांचा उल्लेख नानांनी ‘मर्फी बॉय’ (Murphy Boy) असा केला आणि त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. (Nana Patekar On Ajit Pawar And Hasan Mushrif)

 

कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe), ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) आणि महात्मा बसवेश्वर (Mahatma Basaveshwar) यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे देखील उपस्थित होते. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि नाना पाटेकर हे तिघे चांगले मित्र असल्याचे नानांच्या भाषणातून पहायला मिळाले. (Nana Patekar On Ajit Pawar And Hasan Mushrif)

 

नाना पाटेकर म्हणाले, कोल्हापुरात पुतळ्यांचे नव्हे, तर विचारांचे अनावरण झाले आहे. माणसं गोळा करण्यावर जर टॅक्स असता तर मुश्रीफ हे सर्वाधिक टॅक्स भरणारे असते. आता मुश्रीफ तुम्ही सिनेमात (Cinema) काम करा. मी तुमच्या कागलमधून निवडणूक (Election) लढवतो. तुम्ही नुसतं सांगितलं तरी मी आरामात निवडून येऊ शकतो. ते इतके गोंडस दिसतात की मर्फीच्या जाहिरातीतील मुलगा हा मुश्रीफच होतो की काय असं वाटतं, असे मिश्किल विधान त्यांनी केले अन् एकच हशा पिकला.

 

अजितदादा खूप बदलले

अजित पवारांचे कौतुक करताना नाना पाटेकर म्हणाले, अजितदादा इथं असते तर मजा आली असती. त्यांची एक बोलण्याची धाटणी आहे.
आता पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यांच्यात जमीन आसमानाचा फरक झाला आहे.
अजितदादा आता ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते प्रत्येक शब्द अगदी विचार करुन, एखादा शब्द कसा वापरायचा,
कसं बोलायचं आणि समोरच्याला कसं झाडायचं, तेही शांतपणे कोणताही त्रागा न करता.
तर मला असं वाटतं की दादांच्या आयुष्यातील हे फार मोठं यश आले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करायचं.
सकाळी साडेपाचला उठून या माणसाचं जे काम सुरु होतं त्याबद्दल अजितदादांचे धन्यवाद, असं नाना पाटेकर म्हणाले.

 

Web Title :- Nana Patekar On Ajit Pawar And Hasan Mushrif | ajit pawar has changed a lot and
mushrif is as cute as murphy boy says nana patekar in kagal of kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा