Pune Saswad Double Murder Case | पुणे : सासवड दुहेरी हत्या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलला

सासवड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Saswad Double Murder Case | पुणे जिल्ह्यात गाजलेल्या सासवड येथील दुहेरी हत्या प्रकरणाच्या तपासात (Investigation) आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. सासवड येथे भिकाऱ्यांचा खून (Beggars Murder) करण्यात आला होता. या प्रकरणात (Pune Saswad Double Murder Case) पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh) यांनी स्वत: लक्ष घातले आहे. शनिवारी दिवसभर सासवड येथे येऊन प्रकरणाची माहिती घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या. तसेच या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात (Investigating Officer) आला.

 

सासवड येथील भोंगळे वाईन्ससमोर 24 मे रोजी तीन भिकाऱ्यांना बेदम मारहाण (Beating) करण्यात आली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू (Death) झाला होता. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, नागरिकांनी याबाबत सखोल तपासाची मागणी केल्यानंतर पोलीस तपासात मृत लोकांना मारहाण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सासवड येथील हॉटेल चालक निलेश जगताप (Nilesh Jagtap) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली.

सुरुवातीला या प्रकरणाचा (Pune Saswad Double Murder Case) तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे होता. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप (Police Inspector Annasaheb Gholap) यांनी स्वत:कडे घेतला. मात्र हा तपास आता भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (Bhor Sub-Divisional Police Officer Dhananjay Patil) यांच्याकडे देण्यात आला आहे.

 

दरम्यान, आरोपी निलेश जयवंत जगताप याच्या पोलीस कोठडीत सोमवार पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दोन भिकाऱ्यांच्या मृत्यूने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आमदार जगताप यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांनी हा खुनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला.
तर आमदार जगताप यांनी शिवतारे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

 

 

Web Title :- Pune Saswad Double Murder Case | the investigating officer in the double murder case in saswad changed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा