Nana Patole On Devendra Fadnavis | मटण खाणाऱ्या ब्राह्मणांचा शाप लागत नाही, नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole On Devendra Fadnavis | अकलूज येथे झालेल्या जाहिर सभेत (Akluj Sabha) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना ‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचे वाईट चिंतत नाही, मात्र, माझ्यासोबत विश्वासघात केला की, त्यांचा सत्यानाश होतो, माझा इतिहास तपसा’ असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मटण खाणाऱ्या ब्राह्मणांचा शाप लागत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारी दुपारी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या निवासस्थानी जाऊ त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मटण खाणारे देवेंद्र फडणवीस अशी प्रतिक्रिया दिली. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघांनी मिळून मटण खाल्लं आहे, असे पटोले यांनी म्हटले.(Nana Patole On Devendra Fadnavis)

त्यांना शाप देण्याचा अधिकार नाही

देवेंद्र फडणवीस यांना शाप देण्याचा अधिकार नाही. ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा शाप आता लगत नाही. ते ओरिजनल ब्राह्मण नाहीत ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत. मटण खाणाऱ्या ब्राह्मणाचा शाप लागत नसतो. तुम्ही 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी जे काही बोलला होतात, धनगर समजाला न्याय देऊ, मराठा समाजाला न्याय देऊ, विविध जातींना न्याय देऊ, कुठे केले ते सांगा. त्यामुळे फडणवीसांना हे बोलण्याचा अधिकार नाही आणि शाप देण्याचा अधिकार नाही. त्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला आहे, असे नाना पटोले म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांना मोदी मौनी बाबा म्हणायचे. इंडिया आघाडीचे सरकार (India Aghadi Govt) देशात येईल
आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान होतील. नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे.
कर्नाटकचा प्रज्वल असो किंवा देशभरातले भ्रष्टाचारी हीच भाजपची ओळख आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी
मोदींच्या टीकेला उत्तर दिलं.

निवडणूक धर्मनिरपेक्ष होणे गरजेचे

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) राम सातपुते (Ram Satpute)
आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा प्रचार शिगेला
पोहोचला आहे. योगी आदित्यनाथ यांची नुकतीच सभा झाली. सभेत एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्यात आले. सोलापूर शहरातील अनेक नागरिक भाजप विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील संताप व्यक्त करत देशात धर्मनिरपेक्ष निवडणूका होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया