Nana Patole-Pune Congress Bhavan | महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! विजयाची खात्री असलेल्या उमेदवारास ‘घरपोच’ उमेदवारी देणार – नाना पटोले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Nana Patole-Pune Congress Bhavan | महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकसंघ आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये येणार्‍या पक्षांचे स्वागत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेसच्यावतीने सर्व्हेमध्ये विजयी होण्याची खात्री असलेल्या उमेदवाराला घरपोच उमेदवारी दिली जाईल. यासाठी कोणालाही मुंबई, दिल्लीच्या फेर्‍या माराव्या लागणार नाहीत. जनतेच्या आशीर्वादाने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे ४१ उमेदवार विजयी होतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. (Nana Patole-Pune Congress Bhavan)

काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेस माजी मंत्री आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi), शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Congress Arvind Shinde), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पटोले म्हणाले, की केंद्र आणि राज्यातील सरकारवर जनतेचा रोष आहे. केंद्रातील शेतकरी आणि युवक विरोधी सरकार घालविण्यासाठी देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी भक्कम आहे. नजीकच्या काळात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठांची आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत बैठक होउन निवडणुकीची रणनिती ठरविली जाणार आहे. जागा वाटपाबाबत अद्याप कुठलिच बोलणी झाली नसली तरी जिंकून येण्याचा निकष याच फॉर्म्युल्यावर उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले आहे. पुण्यातही सर्वेक्षण करून त्यामध्ये विजयाची खात्री असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल. येथूनही आमचा उमेदवार विजयी होईल, असा दावा पटोले यांनी केला. (Nana Patole-Pune Congress Bhavan)

आयोध्येतील राम मंदिराचे काफ अर्धवट असतानाही त्यामध्ये श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा घाट घालण्यात
आला आहे. कंत्राट घेतल्यासारखे भाजपकडून निमंत्रणे वाटली जात असल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला.

पटोले असेही म्हणाले….

  • राजस्थानमध्ये सत्ता येताच भाजपने गॅस सिलेंडरचे दर ४५० रुपये केले. महाराष्ट्रासह अन्य राज्य देखिल याच देशाचा भाग आहेत. सर्वच ठिकाणी हे दर ४५० रुपये करण्यात यावेत.
  • मोटार व्हेईकल कायद्यातील हिट ऍन्ड रन कलमाचा त्रास मोठ्या वाहनांसोबत अगदी दुचाकी चालकांनाही होणार आहे.
    केंद्राने हा कायदा कशासाठी आणला हेच कळत नाही.
  • समृद्धी महामार्गाच्या कामात त्रुटी आहेत. रस्ते करताना आवश्यक केमिकल वापरले नसल्याने वाहनांचे टायर फुटून
    अपघात होत आहेत. याची तपासणी करण्याच्या मागणीवर सरकार गंभीर नाही.

परीक्षांच्या पेपर फुटीच्या घटनांमुळे तरुणांचा पैसा, वेळ वाया जात असून मानसिकताही खराब होत आहे.
अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी पेपर फुटीसारख्या घटनांतील दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी.

भाजपला पराभूत करण्यासाठी जे पक्ष आमच्यासोबत येतील त्यांचे स्वागत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत डॉ. प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची चर्चा झाली.
लवकरच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि डॉ. आंबेडकर यांच्यासह
दिल्लीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय होईल.

  • नाना पटोले, प्रदेशअध्यक्ष, काँग्रेस

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांना का द्यावं लागलं स्पष्टीकरण? ”बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही कुणी गैरअर्थ…”

घर मालकाकडून भाडेकरु महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

Shiv Sena MLA Aaditya Thackeray | महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंचं खुलं पत्र, केंद्र आणि राज्याच्या कारभारावर ओढले आसूड, ”गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय…”

लंडन ते मुंबई प्रवासात 152 ग्रॅम सोने गायब, पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल