Nana Patole | अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याला एमसीएच्या (MCA) निवडणुकीचा वास येतो, नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एमसीए (MCA) म्हणजे मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या (Mumbai Cricket Association) होणाऱ्या निवडणुकीसाठी अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri By Election) बिनविरोध करण्यात येत आहे, असा संशय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पटोलेंनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे बोट दाखविले आहे. नाना पटोलेंनी (Nana Patole) एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हंटले आहे.

 

सध्या मुंबईत एमसीएची निवडणूक सुरु आहे. ही निवडणूक म्हणजे पैश्यांच्या खजिन्याची निवडणूक आहे. एमसीए म्हणजे पैशाचा खजिना. याच पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात आता राजकारण सुरु आहे. एक दोन नेत्यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीला एमसीएच्या निवडणुकांचा वास येत आहे. असे मला निश्चितपणे वाटत असल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

मला कोणावर आरोप करायचा नाही. एमसीएमध्ये जे काही सुरु आहे, त्यावर मी बोलतो आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या. त्यात एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही.
एमसीएच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा असा चमत्कार घडतो आहे.
त्यामुळे याला नक्कीच एमसीएच्या निवडणुकीचा वास आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली,
तर त्याला आमचा विरोध नाही. बाकी जनता सूज्ञ आहे, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे भाजपने (BJP) या निवडणुकीसाठी पाठिंबा मागितला होता.
पण त्यांनी पाठिंबा न देता, भाजपलाच हा निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली.
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले.
त्यात त्यांनी रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke)
यांना बिनविरोध आमदार करण्याची विनंती केली आहे.

 

Web Title :- Nana Patole | state president nana patole reaction on congress president election and andheri andheri bypoll election sharad pawar ashish shelar maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका, एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा…

Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोर्ट्सला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला