Nana Patole | ‘जोपर्यंत वाचाळवीरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत…’, – नाना पटोले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाला आजपासून (दि. 19) सुरुवात झाली आहे. विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासूनच आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडीने विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून आंदोलन केले. शिंदे फडणवीस सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महापुरुषांवर आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांवर आगपाखड करत प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांची विधाने जनता विसरली नाही. जो पर्यंत वाचाळवीरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही, असे नाना पटोले (Nana Patole) यावेळी म्हणाले.

 

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. पत्रकारांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांना निलंबित करण्यासाठी सरकारने केवढी तत्परता दाखवली. मग आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई का नाही करण्यात आली? त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल झाला? असे प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून सगळीकडे राज्यात भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करणे सुरू आहे. भाजपमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मंत्री मगंलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यातने अपमान केला, असेही पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

भाजप वाचाळवीरांवर कारवाई करत नाही. हे अत्यंत लाजीरवाणे आहे.
महापुरुषांचा अवमान करणांऱ्यावर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असे पाटोले म्हणाले.
दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात गोंधळ झाला होता.
विरोधकांनी कर्नाटक सीमाप्रश्नावरून सरकारला धारेवर धरले आणि सभागृहात गोंधळ माजवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सीमाप्रश्नावर निवेदन दिले.

 

Web Title :- Nana Patole | why not fir filed against chandrakant patil nana patole demand legal action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल