‘आरे’नंतर ‘या’ आंदोलनकर्त्यांवरील ‘गुन्हे’ मागे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा ‘निर्णय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. आरे कारशेडवर निर्णय घेतल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनासंबंधित मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. जमावबंदी असतानाच आंदोलन केल्याने आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले. त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला.

नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. आरे बचाव आंदोलनात देखील गुन्हे दाखल होते ते देखील मागे घेण्यात आले आहे. निवडणूकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा धडाका ठाकरे सरकारने लावला आहे. नाणार आणि आरे आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले त्यानंतर नाणार प्रकल्प आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पुढे आली. त्यानंतर हे गुन्हे देखील मागे घेण्यात आले.

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असे आश्वासन दिले होते. तसे आश्वासन संघर्ष समितीला देण्यात आले होते. परंतू फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेतले नाहीत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन दिले होते. हेच आश्वासन पूर्ण करत त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिलासा दिला.

Visit : policenama.com