Nanded ACB Trap | 3 हजार रुपये लाच घेताना पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक (Arrest) न करता नोटीस देऊन सोडून दिल्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) करुन तीन हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) किनवट पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nanded ACB Trap) रंगेहाथ पकडले. बालासाहेब नरोबा पांढरे Head Constable Balasaheb Naroba Pandhare (वय-56 रा. कमलाई नगर, हदगाव ता. हदगाव, जि. नांदेड) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. नांदेड एसीबीच्या पथकाने (Nanded ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.20) केली.

 

याबाबत 56 वर्षाच्या व्यक्तीने नांदेड एसीबीकडे (Nanded ACB Trap) शनिवारी (दि.18) तक्रार केली आहे. तक्रारदार, त्यांची पत्नी व दोन मुलांविरुध्द किनवट पोलीस स्टेशन (Kinwat Police Station) आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपींना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिल्याच्या मोबदल्यात आणि यापुढे गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल पांढरे यांनी तक्रारदार यांना 10 रुपये लाच मागितली. त्यापैकी 5 हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले. त्यानंतर पांढरे यांनी तक्रारदार यांना उर्वरित 5 हजार रुपये सोमवारी घेऊन येण्यास सांगितले होते. दरम्यान तक्रारदार यांनी नांदेड एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

नांदेड एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पांढरे यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी करुन यापूर्वीच 5 हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. तसेच उर्वरीत 5 हजार रुपयांपैकी 3 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पोलिसांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 3 हजार रुपये लाच घेताना बालासाहेब पांढरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पांढरे यांच्यावर किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड एसीबी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil),
पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम (Police Inspector Nanasaheb Kadam),
पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार, सचिन गायकवाड, अरशद खान, मारोती सोनटक्के यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nanded ACB Trap | 3 thousand rupees in the net of police anti-corruption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Osho Sambodhi Divas | ओशो संबोधी दिनानिमित्त ओशो शिष्यांची संगीत ध्यानधारणा

Pune Metro News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो एप्रिलपासून गरवारे ते रुबी हॉल धावणार

Pune News | पुण्यात माणुसकीचे दर्शन ! 32 वर्षानंतर घडवून आणली आई आणि मुलांची भेट