Nanded ACB Trap | वाळूचे टिप्पर चालू ठेवण्यासाठी घेतली 21 हजाराची लाच, खिशात सापडले 2.25 लाख, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Nanded ACB Trap | वाळूचे टिप्पर नियमित चालू ठेवण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील (Nanded Rural Police Station) पोलीस कर्मचाऱ्याने 21 हजार रुपये लाच (Accepting Bribe) घेतली. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nanded) कर्मचाऱ्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात 2 लाख 25 हजार रुपये सापडले. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Nanded ACB Trap) तक्रार आल्यानंतर पथकाने सापळा रचून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पाळत ठेऊन ही कारवाई केली. शिवाजी गंगाधर पाटील (Shivaji Gangadhar Patil) असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

शिवाजी पाटील याने तक्रारदाराचे 3 वाळूचे टिप्पर नियमित चालू देण्यासाठी व वाळूच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी प्रति टिप्पर 7 हजार रुपये प्रमाणे 21 हजार रुपये प्रतिमहा अशी मागणी तक्रारादारकडे केली होती. त्यापैकी 7 हजार रुपये यापूर्वीच फोन पे (PhonePay) द्वारे घेतले तर उर्वरीत 14 हजार रुपये सोमवारी (दि.6) रोख स्वरुपात घेतले. लाचेची रक्कम स्विकारताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nanded ACB Trap) पाटील याला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, 6 जून 2022 रोजी नांदेड एसीबीकडे (Nanded ACB) तक्रारदाराने तक्रार दिली होती. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदाराला 3 वाळूचे टिप्पर नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या टिप्परवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रति टिप्पर सात हजार या प्रमाणे तीन टिप्परचे 21 हजार रुपये प्रतिमहा अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यापैकी 7 हजार रुपये फोन पे द्वारे स्विकारले तर उर्वरीत 14 हजार रुपये रोख स्विकारले. पैसे घेताना शिवाजी पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले.

 

Web Title :- Nanded ACB Trap | rs 2 5 lakh was found in the pocket of
nanded rural police officer shivaji patil while accepting bribe of 21 thousands

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा