Nanded Crime | वडिलानेच आपल्या पोटच्या मुलीची केली 3 वेळा विक्री; नांदेड मधील धक्कादायक घटना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  Nanded Crime | नांदेड मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलानेच पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडील, सावत्र आई आणि सावत्र भावंडांनी मिळून अल्पवयीन मुलीला आधी राजस्थान (Rajasthan) येथे दलालांच्या मार्फत विकले होते. परत याच मुलीची औरंगाबाद (Aurangabad) इथून दोन वेळा विक्री झाली होती. पीडित मुलगी ही नांदेड (nanded crime) मधील हदगाव येथे वास्तव्यास आहे. खुद्द मुलीनेच याबाबत हदगाव पोलीस ठाण्यात (Hadgaon Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी, की, पीडित मुलगी ही नांदेडची आहे.
या मुलीला वडिलांनी राजस्थानमधील कोटा येथील एका व्यक्तीला विकले.
येथे आरोपींनी तिच्यावर अत्याचार सुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे.
मग आरोपीने या मुलीला पुन्हा आपल्या वडिलांकडे आणून सोडले.
त्यानंतर पीडित मुलीला नंदूरबार (Nandurbar) येथे विकले.
या ठिकाणी ज्या व्यक्तीला विक्री करण्यात आली होती, त्याने पैसे न दिल्याने तिला पुन्हा घरी आणले.
यानंतर आरोपी वडिलाने पुन्हा तिसऱ्यांदा मुलीची विक्री साताऱ्यात (Satara) केली.

दरम्यान, हा सर्व प्रकार पीडित मुलीने फोनवरुन आपल्या मावशीला सांगितला.
त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये गुन्हा घडल्याने हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, इतर आरोपी आणि दलाल फरार आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : nanded crime | nanded father sold his daughter three times in two years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 152 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

National Nutrition Week 2021 | ‘या’ 8 गोष्टींमध्ये सर्वात जास्त पोषकतत्व, तुम्ही देखील खाण्यास सुरूवात करा; जाणून घ्या

Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस पुण्यात मुसळधार; 15 जिल्ह्यांना आज ‘Alert’