Nanded Firing Case | नांदेडमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यावर गोळीबार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार (Nanded Firing Case) करण्यात आला आहे (Nanded Crime News). शहरातील बाफना उड्डानपुलावर काल दि. ९ रोजी रात्री ही घटना घडली. काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड या आपल्या स्कुटीवरून मगनपूरा येथून रात्री घरी जात होत्या. उड्डानपुलावर एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड जखमी झाल्या. त्यांच्या खांद्याला एक गोळी लागली आहे. त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. सदर घटना ही जुन्या वादातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Nanded Firing Case)

हाती आलेल्या माहितीनुसार, नांदेड मधील एका महिला कार्यकर्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. नांदेड शहरातील बाफना उड्डानपुलावर ही घटना घडली. काल दि. ९ रोजी काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड या आपल्या स्कुटीवरून घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. त्यानंतर त्यांना तात्काळ शासकीय रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकरणी आरोपींचा शोध नांदेड पोलीस घेत आहेत. (Nanded Firing Case)

दरम्यान, स्थानिक राजकारणात अशा घटना वारंवार होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अगदी काही दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले.
त्यादरम्यान बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली होती.
विरोधात काम केले म्हणून तिघांना बेदम मारहान करण्यात आली होती.
त्यातच एकाचा बेदम मार बसल्याने उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. ही घटना बीडच्या आष्टी शहरात घडली होती.
त्यानंतर या घटनेविरोधात बीड जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

त्यावरून आता स्थानिक राजकारणात कशाचा तरी राग धरत पदाधिकाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Web Title :- Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘हे जिवंत सरकार नाही’; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

Maharashtra Politics Issue | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी