पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस हवालदार तडकाफडकी बडतर्फ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास आणि एका पोलिस हवालदारास तडकाफडकी बडतर्फ केले आहे.

पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे आणि पोलिस हवालदार संतोष राणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सासरवाडीत गेल्यानंतर जावई शेख सद्दाम शेख अहमद यांना बेदम मारहाण झाली होती. त्याची तक्रार देण्यासाठी तो हिमायतनगर पोलिस ठाण्यात आला होता. तेथे देखील त्यांना मारहाण झाली.

दि. 7 जुलै रोजी रागाच्या भरात त्याने पोलिस ठाण्यातच स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यामध्ये तो 90 टक्के भाजला. त्याच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहेत. त्याने दिलेल्या जबाबवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, हवालदार संतोष राणे यांच्यासह 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत उपनिरीक्षक काळे आणि हवालदार राणे यांच्याबद्दल पोलिस महासनिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यावर महानिरीक्षक मुत्याळ यांनी उपनिरीक्षक काळे आणि हवालदार राणे यांना बडतर्फ केले आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांपैकी शेख सरदार आणि शेख सिराज यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस हवालदार तडकाफडकी बडतर्फ झाल्याने नांदेड पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या