Nandurbar Police | ‘गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा’ राबवण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील अतिदुग्रम समजला जातो. मात्र नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने (Nandurbar Police) ‘गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा’ (Crime and Criminal Tracking Network System) अर्थात CCTNS प्रणाली राबवण्यात महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नंदुरबार पोलीस दलाने (Nandurbar Police) अनेक अडचणींवर मात करुन पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामाजाची वेळेत व जास्तीत जास्त ऑनलाईन फिडींग (Online Feeding) करुन सीसीटीएनएस पथकाने जुलै 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 

CCTNS प्रणालीची सुरुवात महाराष्ट्रात 2015 मध्ये झाली आहे. या प्रणालीत पोलीस ठाणे स्तरावर (Police Station Level) दैनंदिन होणाऱ्या प्रत्येक घडामोडींची ऑनलाइन नोंद घेण्यात येत असते. यात सुरुवातीला खबर अहवाल (FIR), स्टेशन डायरी नोंद, अटक (Arrest) आरोपींच्या नोंदी, तसेच पोलीस ठाण्यात हस्तलिखीत होणाऱ्या सर्व नोंदी या CCTNS प्रणालीत संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतात. प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे याचे काम करुन घेत असतात आणि यावर प्रत्यक्ष पर्यवेक्षण नंदुबार जिल्हा पोलीस दलाचे (Nandurbar Police) पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांच्याकडून होत असते.

 

महाराष्ट्र शासनाने सुरु कलेली CCTNS प्रणाली महाराष्ट्रात 36 जिल्हे व 11 पोलीस आयुक्तालयात राबवण्यात येते. नंदुरबार जिह्याने 232 पैकी 222 गुण प्राप्त करुन महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नंदुरबार जिल्ह्यात इंटरनेटचा स्पीड, सुरळीत नसणारा वीज पुरवठा व इतर अत्याधुनिक सुविधा नसताना CCTNS प्रणाली राबवण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दालात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात CCTNS प्रणाली चे मुख्य सर्व्हर असून याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक नयाना देवरे (API Nayana Deore) व त्यांचे पथक पोलीस ठाणे स्तरावरील दैनंदिन ऑनलाइन फिडींगच्या कामावर देखरेख ठेवतात. याशिवाय पोलीस ठाण्याला येणाऱ्या तांत्रिक व इतर अडचणी सोडवण्याचे काम करतात.

 

ही कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl Vijay Pawar),
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hire),
शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे (Sub Divisional Police Officer of Shahada Division Shrikant Ghumre),
अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत (Sub Divisional Police Officer of Akkalkuwa Division Sambhaji Sawant),
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Local Crime Branch Police Inspector Ravindra Kalamkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे,
पोलीस नाईक राजेंद्र मोरे व नंदुरबार जिल्ह्यातील CCTNS प्रणाली चे काम पाहणारे पोलीस अंमलदार याच्या पथकाने केली.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सर्व टीमचे अभिनंदन करुन त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.

 

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar district second in Maharashtra in implementation of Crime and Criminal Tracking Network System

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

 

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

 

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू