Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून ‘हामरीतुमरी’वर आलेल्या 5 दाम्पत्याच्या संसारात पुन्हा ‘गोडवा’; जनता दरबारात 106 तक्रारींचे निवारण

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | कौटुंबिक वाद (Family Disputes), जमिनीचे वाद (Land Disputes), फसवणूक (Fraud), धमकी (Threats) अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नंदुरबार जिल्हा (Nandurbar District) पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (SP P. R. Patil) यांच्या संकल्पनेतून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात (Nandurbar Taluka Police Station) ‘जनता दराबारा’चे (Janata Darabar) आयोजन (Nandurbar Police) करण्यात आले होते. या जनता दरबारात 106 तक्रारीपैकी 90 तक्रारींचे निरसन करण्यात आले. तर 5 दाम्पत्यामध्ये पी. आर पाटील (IPS PR Patil) यांनी समझोता घडवून आणून त्यांचे संसार वाचवले.

 

 

नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) ‘जनता दरबारा’चे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री (Collector Manisha Khatri) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar), उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Deputy Divisional Police Officer Sachin Hiray), नायब तहसीलदार बी.ओ.बोरसे (Deputy Tahsildar B.O. Borse), विधी सेवा प्राधिकरणाचे विधीतज्ञ अ‍ॅड. मोहन गिरासे (Lawyer Adv. Mohan Girase), अ‍ॅड. सीमा खत्री (Adv. Seema Khatri), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (LCB Police Inspector Ravindra Kalamkar),

 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे (Nandurbar City Police Station) पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (Police Inspector Kiran Kumar Khedkar), उपनगर पोलीस ठाण्याचे (Upnagar Police Station) पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे (Police Inspector Narendra Bhadane), शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर (City Traffic Branch Police Inspector Sunil Nandwalkar), जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव (District Special Branch Police Inspector Bharat Jadhav), पोलीस दलातील व महसुल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 300 हून अधिक नागरिक उपस्थित होते.

 

…त्यावेळी जनतेच्या समस्या सोडवणे सोपे जाईल-जिल्हाधिकारी
नंदुरबार पोलिसांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराविषयी बोलताना जिल्हाधीकारी मनिषा खत्री यांनी कौतुक केले. पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी किंवा त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस दलाचे पर्य़ायाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सामान्य जनतेप्रती असलेल्या कर्तव्य भावनेची जाणीव सर्वांना करुन देऊन नंदुरबार पोलीस दल सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. सामान्य माणुस आज देखील प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसमोर येऊन मोकळेपणाने समस्या मांडण्यास घाबरतो. प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबतची सामान्य जनतेच्या मनातील भीती ज्यावेळी निघून जाईल त्यावेळी प्रशासनाला देखील जनतेच्या समस्या सोडवणे सोपे जाईल. नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तक्रार देण्याचे टाळू नये, असे आवाहन मनिषा खत्री यांनी यावेळी केले.

 

 

 

सत्याला न्याय देण्यासाठी ‘जनता दरबार’- पी.आर. पाटील
जनता दरबाराच्या आयोजनाबाबत सांगताना पोलीस अधीक्षक पी.आर पाटील म्हणाले, मागील काही दिवसांपासून अनेक सामान्य नागरिकांनी त्यांना कार्यालयात भेटून त्यांच्या कौटुंबीक, शेतजमीनी विषयी, गुन्ह्यांशी संबंधीत व इतर समस्या, तक्रारी मांडत होते. मात्र, कार्यालयात बसून त्यांना तक्रारीचे निरसन करता येत नव्हते. पोलिसांचे कामकाज अतिशय व्यस्त असल्याने कामाच्या ओघात पोलिसांकडून त्यांची समस्या किंवा तक्रारीचे समाधान होत नव्हते. पोलीस विभागाकडून सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे समाधान करण्यासाठी तसेच सत्याला न्याय देण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी पोलीस व जनता दरबार आयोजित केल्याचे पी.आर. पाटील यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशा प्रकारचे जनता दरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरवले जातील असे पी. आर पाटील यांनी सांगितले.

 

5 दाम्पत्यामध्ये समझोता
या जनता दरबारामध्ये पती पत्नीच्या भांडणातून झालेल्या वादाचे 5 प्रकरणे आली होती. या 5 दाम्पत्यांचा जनता दरबारामध्ये समझोता घडवून आणत त्यांचे मनोमिलन करण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी पाचही दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

जनता दरबारात 90 तक्रारींचे निरसन
नंदुरबार पोलिसांनी आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये कौटुंबीक वादाच्या 13, शेत जमिनी विषयी 23,
हरवलेल्या मोबाईल बाबत 4, ऑनलाइन फसवणूक 3, आर्थिक पसवणूक 7, धमकी, शिवीगाळ करणे,
मारहाण करणे या स्वरुपाच्या अदखलपात्र गुन्ह्याबाबत 33, इतर विभाग (महसूल व महावितरण) 18, माहिती
मिळणेबाबत 10, चारित्र्य पडताळणीचे 4, पासपोर्ट पडाळणी 1 असे एकूण 106 तक्रारी मांडण्यात आल्या होत्या.
त्यापैकी 90 तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारात निरसन करण्यात आले.
यातील बहुतांश तक्रारी पोलीस अधीक्षक पी. आर पाटील यांनी स्वत: हताळल्या.
उर्वरीत 16 तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली असून त्या तक्रारींची अधिक चौकशी करुन निर्णय घेतला जाणार आहे.
निरसन झालेल्या तक्रारी पैकी एका प्रकरणात भारतीय दंडविधान संहितेनुसार,
एका प्रकरणात अदखलपात्र गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर एका प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (API Sandeep Patil) यांनी केले.

 

 

Web Title : – Nandurbar Police | sweetness again in 5 couples who came to fight; Nandurbar police solve 106 complaints in Janata Darbar ips pr patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sindhudurg Crime | पुण्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा तारकर्लीच्या समुद्रात बूडून मृत्यू

 

Pune Crime | दारु पिण्यास पैसे नसल्याने मित्राच्या मदतीने पत्नीचे दागिने चोरले, बिबवेवाडी पोलिसांकडून दोघांना अटक

 

Hardik Patel On Congress | काँग्रेस पक्षाला रामराम केलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसला सवाल; म्हणाले – ‘भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे ?’