Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम ! जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबार पोलिसांकडून (Nandurbar Police) नागरिकांच्या हिताचे अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी 30 ठिकाणी पाणपोईची (Panapoi) सोय करुन देत नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. नंदुरबार पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात कित्येक लोकांचा उष्माघाताने बळी (Heat Stroke Victims) जातो. या पार्श्वभूमीवर डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासी (Tribal) पाड्यांसह नंदुरबार, शहादा (Shahada), अक्कलकुवा (Akkalkuwa) या शहरात अशा पाणपोईंची सोय करण्यात आली आहे. पोलीस दलाच्या मदतीला असलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून या पाणपोईंमध्ये पाणी भरले जाते व देखभाल केली जाते आणि त्यांवर तेथील बीटचा पोलीस (Beat Police) अंमलदार देखरेख करतो. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (Superintendent of Police PR Patil) यांची ही संकल्पना त्यांच्या ‘टीम नंदुरबार पोलीस’ने अंमलात आणली आहे.

 

 

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (Nashik Range Deputy Inspector General of Police) डॉ. बी.जी. शेखर पाटील (Dr. B.G. Shekhar Patil) हे नंदुरबार जिल्हा वार्षिक तपासणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना (Nandurbar Police) गुन्हेगारीविषयीच्या तसेच एकूण कामकाजाबद्दल मार्गदर्शन करुन जिल्ह्यातील पोलिसांनी काही सामाजिक उपक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.

 

एप्रिल-मे महिन्यात नंदुरबार जिल्ह्याचा पारा 40 ते 44 डिग्री सेल्सीयसच्या आसपास असतो. उन्हाळ्यात लग्नसराई किंवा धार्मीक कार्यक्रम जास्त असल्याने अनेक लोक प्रवास करत असतात. सामान्य लोक खरेदीसाठी बाजारात जात असतात. विद्यार्थी शिक्षणासाठी व कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी येतात. अशांना पैशा अभावी गार पाण्याची बाटली घेणे शक्य होत नाही. अशा नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करुन देण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP PR Patil) यांनी आढावा बैठकीत मांडली.

 

पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेस जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आप-आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांसाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करुन दिली. मागे एका गरीब वृद्ध इसमाला त्याचे पैसे चोरीला गेल्याने वर्गणी काढून 50 हजाराची हटके मदत केल्यामुळे चर्चेत आलेल्या नंदुरबार पोलीसांनी आता कडक उन्हाळयात आपल्या जिल्ह्यातील आदिवासी जनतेची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

 

या ठिकाणी सुरु करण्यात आल्या पाणपोई

1. नंदुरबार शहर पोलीस स्टेशन (Nandurbar City Police Station)

2. नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन (Nandurbar Taluka Police Station)

3. उपनगर पोलीस स्टेशन (Upnagar Police Station)

4. नवापुर पोलीस स्टेशन (Navapur Police Station)

5. विसरवाडी पोलीस स्टेशन (Visarwadi Police Station)

6. शहादा पोलीस स्टेशन (Shahada Police Station)

7. धडगांव पोलीस स्टेशन (Dhadgaon Police Station)

8. म्हसावद पोलीस स्टेशन (Mhasawad Police Station)

9. सारंगखेडा पोलीस स्टेशन (Sarangkheda Police Station)

10. अक्कलकुवा पोलीस स्टेशन (Akkalkuwa Police Station)

11. तळोदा पोलीस स्टेशन (Taloda Police Station)

12. मोलगी पोलीस स्टेशन (Molgi Police Station)

13. शहर वाहतुक शाखा (City Traffic Branch)

 

असे एकूण 30 ठिकाणी पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत.

 

Web Title :- Nandurbar Police | Unique initiative of Nandurbar Police! Drinking Water facilities at 30 places by the police in the district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Uric Acid And Vitamin C Deficiency | ‘विटामिन-सी’च्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते यूरिक अ‍ॅसिडची समस्या, ‘या’ वस्तूंचा आजच करा आहारात समावेश

 

Crime News | जिजूच्या प्रेमात मेहूणी झाली अंधळी; संधी मिळताच पतीचा काढला काटा

 

Pune Crime | दुर्दैवी ! पत्नीचा आणि मुलाचा प्राण वाचवताना पतीचा मृत्यू, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील घटना