Crime News | जिजूच्या प्रेमात मेहूणी झाली अंधळी; संधी मिळताच पतीचा काढला काटा

औरंगाबाद : वृत्तसंस्था – Crime News | बिहारच्या नवीननगर जिल्ह्यातील (Navinnagar District) चंद्रगढमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या नवऱ्याच्या (Sister’s Husband) प्रेमात अंधळी झालेल्या मेहूणीने (Sister in Law) जिजूसोबत मिळून पतीचाच काटा काढला. पतीला लाठी – काठ्यांनी इतकी मारहाण (Beating) करण्यात आली की त्यात त्याचा जीव गेला. या घटनेमुळे गावात खळबळ (Crime News) उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संध्या देवीचे (Sandhya Devi) बहिणीच्या पतीशी प्रेमसंबंध (Love Affair) होते. या प्रेमसंबंधाला पती आड येत असल्याने त्यातूनच तिने तीन जणांच्या साथीने पती धनंजयची हत्या केली. पोलीस अधीक्षक कुमार मिश्रा (SP Kumar Mishra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल यादव (Gopal Yadav) 21 मार्चला गुन्हा (FIR) दाखल केला होता. (Crime News)

 

दिलेल्या फिर्यादीत त्यांनी मुलगा धनंजय यादव (Dhananjay Yadav) याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला.
याशिवाय त्याला मारहाण केल्याचेही दिसत होते. त्यामुळे अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, ज्यावेळी पोलिसांनी तपास सुरु केला, त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. धनंजयची पत्नी संध्या देवीचे जिजू लल्लू यादव (Lallu Yadav) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. संध्या देवीने जिजू आणि अन्य दोन व्यक्तींच्या मदतीने पतीला हॉकी स्टीकने मारहाण केली होती. दरम्यान, पोलिसांनी हॉकी स्टीक, दुचाकी आणि मोबाईल जप्त केले आहेत.

 

Web Title :- Crime News | wife murder husband in love with sisters husband incident took place in aurangabad bihar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा