Narayan Rane | नारायण राणेंचा जोरदार हल्ला, म्हणाले – ‘आदित्य आणि मांजराचा काय संबंध, अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे (Sindhudurg District Bank Election) राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे संतोष परब (Santosh Parab) यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून अटकेची कारवाई सुरु असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार प्रहार केला आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) ओळखत नाही, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नाचे, प्रभूंची औकात काय? अशा शब्दांत नारायण राणे (Narayan Rane) यांनी हल्ला चढवला आहे. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मांजरीचा संबंध काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमदार नितेश राणे यांच्यावर सुरु असलेल्या अटकेच्या कारवाईवरुन नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याकडे सत्ता आल्यास त्यांनी केलेले गैरप्रकार उघड होतील. त्या भीतीतून नितेश यांना गोवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. एका आमदारासाठी एवढी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. एखाद्या दहशतवाद्यासाठी (Terrorists) तरी यंत्रणा कामाला लावली होती का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी नितेश राणे कुठे आहेत, हे सांगायला मुर्ख वाटलो का, असे म्हणत अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे देखील काही दिवस अज्ञातवासात होते, याची आठवण करुन दिली.

आदित्य आणि मांजराचा काय संबंध ?

आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करताना मांजराचा आवाज काढला होता. नितेश यांच्या कृतीला नारायण राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले. आदित्य आणि मांजराचा काय संबंध असा सवाल त्यांनी केला. मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. वाघाची मांजर कधी झाली असा प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला.

अजित पवारांना ओळखत नाही

अजित पवार कोण त्यांना ओळखतही नसल्याचे सांगत नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा संदर्भ देऊ नका असेही त्यांनी म्हटले.
कोकणात पूर, नैसर्गिक वादळ आले तेव्हा कुठे होते अजित पवार, असा प्रश्न त्यांनी विचारला.

भास्कर जाधव नाचे

पंतप्रधानांवर (PM) कोणी बोललं तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर तसेच उत्तर देऊ,
आमच्यातही नकलाकार आहेत, असे राणे यांनी ठणाकवले. भास्कर जाधव हे नाचे असल्याची टीका त्यांनी केली.

Web Title : Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane criticize on aditya thackeray ajit pawar and bhaskar jadhav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर