Narayan Rane | ‘या एक आमदार वाल्यानं…’, नारायण राणेंचा राज ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) निकालावर भाष्य करताना मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील भाजप (Maharashtra BJP) नेत्यांना लक्ष्य केलं होतं. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात किती आमदार (MLA)-खासदार (MP) आहेत? असा खोचक सवाल नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.

 

 

काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्रात केंद्रातल्या भाजपच्या वरीष्ठ नेत्यांचंच चालतं. राज्यातल्या नेत्यांना कोणी विचारात घेत नाही. मोदी शाह आहेत म्हणून त्यांचं अस्तित्व असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात नारायण राणे (Narayan Rane) यांना विचारले असता त्यांनी उलट खोचक प्रश्न करत ‘राज ठाकरेंचे किती आमदार-खासदार आहेत महाराष्ट्रात’ असा सवाल केला.

नारायण राणे पुढे म्हणाले, अशांनी मोठ्या पक्षांवर भाष्य करावं का? आमचे देशात 302 खासदार आहेत. महाराष्ट्रात स्वत:चे 105 आमदार आणि इतर 12 आमदार आहेत. आणि या एक आमदार वाल्यानं लोकप्रियतेची भाषा करावी आणि तुम्ही त्यावर चर्चा करावी?

यावेळी बोलताना नरायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊत सध्या काय करतो? पोपट मेला वगैरे ही भाषा त्याची?
पोपट शिवसेनेत (Shivsena) होता त्यावेळी जिवंत होता, भरारी घेत होता.
पंखावर काहीतरी घेऊन मातोश्रीत प्रवेश करत होता तेव्हा चांगला होता? आणि आता मेला?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं एक स्टेटस आहे. त्यांच्याबद्दल कुणी अपशब्दानं बोलू नये. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे नैराश्यात आहेत. सत्ता गेली म्हणून वेड्यासारखं बडबडत असल्याची टीका राणे यांनी केली.

 

Web Title : Narayan Rane bjp leader narayan rane mocks raj thackeray on elected mla of mns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा