शिवसेना-भाजपची नारायण राणेंनी उडवली खिल्ली

सिंधुदुर्ग : पोलीसनामा आॅनलाइन – अच्छे दिन आले नाहीत, १५ लाख खात्यात जमा झाले नाहीत. शिवसेना, भाजप जनकल्याण करणार नाही. शिवसेनेला निवडणूक आली की राम मंदिर आठवते. कुवत आणि क्षमता नसताना हे राममंदीर बांधायला निघाले आहेत, असे म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जिल्ह्यातील पहिली सभा वैभवाडीत पार पडली. या सभेत राणे बोलत होते. विशेष म्हणजे आगामी निवडणूकांमध्ये स्वबळाचे संकेत राणेंनी आपल्या भाषणातून दिले आहेत.

रावसाहेब दानवेंमुळे भाजपमध्ये गुंडांचा प्रवेश : आ. गोटे यांचे आमदारांना खुले पत्र 

राणे म्हणाले, शिवसेना ६६ साली जन्माला आली, तेव्हा मुंबईत ६० टक्के पेक्षा अधिक मराठी लोक राहत होते. आता ही टक्केवारी २०-२५ टक्क्यांवर आली आहे. लोकसभा निवडणूक आली की शिवसेनेला अल्पसंख्यानकाबद्दल प्रेम वाटते. सत्तेतून जरी हाकलून काढले तरी हे जाणार नाहीत, असे म्हणत राणे यांनी शिवसेना आणि भाजपची खिल्ली उडवली. जिल्ह्यातील तीनही विधानसभा आणि लोकसभेची जागा स्वाभिमान पक्ष  जिंकेल, असे सांगत नारायण राणेंनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचे संकेत यावेळी त्यांनी दिले. या जाहीर सभेला खासदार नारायण राणे, निलेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या सभेला काँग्रेस आमदार नितेश राणे देखील व्यासपीठाच्या समोर उपस्थित होते.