Narayan Rane on Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते’ – नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane on Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बीकेसीतल्या सभेतील भाषणानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते, ‘ असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

”मोठा गवगवा करुन उद्धव ठाकरेंनी बीकेसीत जाहीर सभा घेतली. कुठलीही निवडणूक नाही, तरीही एवढी जाहीरातबाजी करुन त्यांना सभा घ्यावी लागली. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी ही सभा घेतली. या सभेला इतका जास्त खर्च केलाय की, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला मला लाज वाटते. यशवंतराव चव्हाणांपासून (Yashwantrao Chavan) देवेंद्र फडणवीसांपर्यंत (Devendra Fadnavis) अनेक मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या प्रतिमेबरोबरच महाराष्ट्राची प्रतिमा वाढवण्याचं काम केलं. दिग्गज होते सगळे, राज्यातून नंतर दिल्लीला अनेकजण गेले आणि देशातही आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. पण परवाचं भाषण ऐकल्यानंतर वाईट वाटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं,” असं नारायण राणे म्हणाले.

पुढे नारायण राणे म्हणाले, ”कसलं मुल्यमापन करता तुम्ही ? अयोध्येत तुमचे लोक होते तुम्ही कुठे होतात ? शिवसेनेच्या 35 वर्षांच्या वाटचालीत तुम्ही दिसलात का ? मराठी तरुणांच्या हातात तुम्ही दगडच दिलेत. दगड देऊन ज्या लोकांनी केसेस अंगावर केले आज उद्ध्वस्त झाले. विठ्ठल चव्हाण, रमेश मोरे, जया जाधव हे का मेले हे अजून कळलं नाही. मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावं. इतिहास काढायला लावू नका. तुम्ही कधीच नव्हता तिथे,” असा घणाघात राणे यांनी केला.

 

दरम्यान, ”लोकांच्या चुली पेटवायला निघालात ? उलट लोकांचं जीवन उद्ध्वस्त करायला निघाला आहात.
दिशा सालियानचा संसार उद्ध्वस्त केलात, सुशांत सिंगचा केलात, पूजा चव्हाण यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आणि चुली पेटवणार म्हणतात.
मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे खोटारडेपणा आणि बोगसपणा असल्याचा,” आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

 

Web Title :- Narayan Rane on Uddhav Thackeray | i am ashamed to call uddhav thackeray as chief minister says narayan rane

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा