Narayan Rane | ‘तू मुख्यमंत्री होतास ना? तेव्हा मुळापासून गुंडगिरी का उखडून टाकली नाही?’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर ‘प्रहार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाल्याचे म्हणाले होते. ठाकरेंच्या त्या टीकेवर नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे हा महाफडतूस माणूस असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे फक्त शिव्या देण्याचं काम करु शकतो बाकी काहीही नाही असंही नारायण राणे यांनी म्हटले आहे. आव्हान देण्याचं काम करु नका, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगाच्या पाठीवर नाव लौकिक मिळवला आहे. नऊ वर्षात भारताला पाचव्या क्रमांकावर घेऊन गेलेत. नारायण राणे (Narayan Rane) पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे हा तसलाच माणूस

काही राज्यांमध्ये अशी पद्धत आहे की घरात माणूस गेला की रडायला माणसं बोलवतात. रुदाली (Rudali) असं त्यांना संबोधलं जातं. त्यांना कशाचंही सोयर-सुतक नसतं. पैसे मिळाले की ते रडताता, उद्धव ठाकरे हा तसलाच माणूस आहे. कुणाचंही काही झालं की तिथे पळायचं, पत्नीला आणि मुलीला घेऊन आणि रडायला लागतो.

अडीच वर्षात भरपूर मोल कमालं

यावेळी नारायण राणे (Narayan Rane) यांनी संत तुकारामांच्या (Saint Tukaram) गाथेतील ओळी वाचून दाखवल्या. मोले घातले रडाया | नाही असूं आणि माया || याचा अर्थ असा आहे की अडीच वर्षात भरपूर मोल कमालं आहे आता रडायचं काम बाकी आहे. त्या आसवांमध्ये मायाही नाही आणि प्रेमही नाही, अशी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

तू मुख्यमंत्री होतास ना?

आता उद्धव ठाकरेचं भवितव्य काहीही नाही. या राज्यात तरी नाही.
तू मुख्यमंत्री होतास ना? तेव्हा मुळापासून गुंडगिरी का उखडून टाकली नाही?
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसैनिक होते, नारायण राणे होते पण ते तुला भारी पडले ना?
आमचे देवेंद्र फडणवीस सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत.
मातोश्री क्रमांक एक आणि दोन हे शंभर टक्के अधिकृत आहेत का? त्यातला बेकायदेशीर भाग किती आहे?
असाही प्रश्न राणे यांनी केला.

Web Title :- Narayan Rane | what is left for uddhav thackeray but to cry ask narayan rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘फडणवीसांना गृहमंत्री पदावरून हटवा किंवा त्यांचा राजीनामा घ्या’, ठाकरे गटाच्या खासदाराने घेतली अमित शहांची भेट

NCP MLA Rohit Pawar | ‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नेता फडणवीसांसोबत पहिल्या रांगेत’, रोहित पवारांचा संताप, म्हणाले- ‘महाराष्ट्राच्या जखमेवर…’

Maharashtra Cabinet Expansion | सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच, राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी माहिती आली समोर