भाजपच्या जाहीरनामा समितीवर नारायण राणे यांची नेमणूक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेला चवताळण्याची भाजप रोज नव्याने संधी देतो आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला सदमा बसला आहे. भाजपने शिवसेनेला युती करायला दबाव टाकण्यासाठी राणे यांची मुद्दाम बढती केली आहे असा राजकीय जाणकारांनी कयास लावला आहे. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष स्थान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना देण्यात आले असून राणे यांची जाहीरनामा समितीत लागलेल्या वर्णी वरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

राजनाथ सिंह यांच्या सह अरुण जेटली ,  पियूष गोयल, शिवराज सिंह चौहन यांच्या या प्रमुख नेत्यांच्या नेमणुकी  बरोबरच एकूण २० नेत्याची नेमणूक या जाहीरनामा समितीवर करण्यात आली आहे. तर भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे याचे १६वे स्थान आहे.

शिवसेने सोबत भाजपची युती झाली तर मी भाजप सोबत नजाता स्वतंत्र लढेल असे नारायण राणे यांनी मागेच जाहीर केले असताना भाजपने नारायण राणे यांची भाजपच्या जाहीरनामा समिती नेमणूक का केली. शिवसेनेला राणेंची नेमणूक करून भाजपने गर्भित इशारा तर दिला नाही ना? अशा उलट सुलट चर्चांना आता रंग चढू लागला आहे. त्यामुळे भाजपच्या माऱ्याने घायळ झालेली शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेते हे पाहण्या सारखे राहणार आहे. शिवसेनेच्या नेत्याकडून अद्याप तरी नारायण राणे यांच्या जाहीरनामा समितीच्या नेमणुकीवर भाष्य दिले गेले नाही परंतु भविष्यात शिवसेना राणे यांच्या नेमणुकी वरून भाजपला निशाणा करू शकते.

जाहीरनामा समिती व्यतिरिक्त प्रचार आणि प्रसार समिती आणि सामाजिक संघटन संपर्क समितीची नेमणूक करण्यात आली आहे. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांची नेमणूक प्रचार प्रसार समितीच्या अध्यक्ष पदी करण्यात आली आहे. तर या समितीत जेटलींसह इतर आठ मंत्री आणि महत्वाच्या नेत्यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे.  सामाजिक स्वयंसेवी संघटन संपर्क समितीची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या समितीत भाजपच्या १३ मंत्र्यांसहित अन्य नेत्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.