Narcotics Control Bureau | एनसीबी अधिकारी व्हायचायं?, काय पात्रता?, जाणून घ्या पगार आणि इतर सर्वकाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Narcotics Control Bureau | अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु त्यामध्ये कोणत्या क्षेत्रात उतरावे हे अद्याप समजलं नसतं. दरम्यान, अलिकडेच मुंबई क्रूझ पार्टी (Mumbai Drugs Party Case) प्रकरणावरुन अंमली पदार्थ निंयत्रण विभाग (Narcotics Control Bureau) सध्या चर्चेत आहे. NCB विभागात भारतातील अनेक तरुणांचा कल वाढताना दिसत आहे. करिअरच्या दिशेने जात असताना तरुण एनसीबीचा मार्ग धरत आहे. मात्र, NCB अधिकाऱ्यांकडे काय अधिकार असतात?, एनसीबी अधिकारी (NCB officer) बनण्यासाठी पात्रता काय? याबाबत जाणून घ्या.

 

NCB चे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. तसेच, चेन्नई, अहमदाबाद, जम्मू, कोलकाता, मुंबई, लखनऊ, बंगळुरू, चंदीगड, पाटणा, दिल्ली, जोधपूर आणि इंदूर येथे विभागीय कार्यालय आहेत. एनसीबीची (Narcotics Control Bureau) स्थापना 17 मार्च 1986 रोजी झाली. नार्कोटिक्स ड्रग्ज आणि अवैध तस्करी रोखणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, एनसीबी ही नोडल ड्रग कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था आहे. एनसीबी थेट गृह मंत्रालयाला (MHA) अहवाल देते. एनसीबी ही संस्था खूप ताकदवान मानली जाते. या संस्थेत थेट अधिकारी भरती शिवाय भारतीय महसूल सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि निमलष्करी दलांमधून भरती केली जाते.

 

पात्रता-

– उमेदवार हा भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे.

– उमेदवारांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी नसावे.

– उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

– उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असावा.

– आवश्यक पात्रता प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी यूपीएससी/एमपीएससी परीक्षा देणे गरजेचे आहे.

– यूजी किंवा पीजी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार यूपीएससी किंवा एनसीबी भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतात

वेतन-

– ज्युनिअर इंटेलिजन्स अधिकारी सुरुवातील – 1.80 हजार वार्षिक ते 4 लाख 20 हजारपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.

– नार्कोटिक्स इन्स्पेक्टर पदासाठी 2 लाख 40 हजार वार्षिक ते 5 लाख 50 हजारपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.

 

Web Title :- Narcotics Control Bureau | becoming an narcotics control bureau ncb officer know salary qualifications details in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LPG Connection | केवळ एका मिस्ड कॉलवरून मिळेज LPG कनेक्शन, ‘हा’ नंबर करा मोबाईलमध्ये सेव्ह

Parambir Singh | परमबीर सिंह प्रकरणात सरकारी वकिलांची तपास अधिकाऱ्यांविरोधात CM, DGP यांच्याकडे तक्रार

Numerology | अंक ज्योतिषनुसार ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर लक्ष्मी मातेची असते कृपा, कधीही भासत नाही पैशाची कमतरता