Video : मराठी दिग्गजांनी गायलेली ‘ही’ २ गाणी मोदींच्या सर्वाधिक आवडीची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत चांगलीच गाजतीय. या मुलखतीत मोदींविषयी अनेक गोष्टींचा उलघडला झाला. या मुलखती दरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील काही बाबी देखील मोदींनी संगितल्या. या मुलाखतीदरम्यान कोणती गाणी तुम्हाला आवडतात असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी मराठी दिग्गजांची नावे घेतली.

मोदींना आवडतात ही गाणी

आवडती गाणी कोणती? या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ज्योती कलश छलके’ या मराठी गाण्याचा उल्लेख केला. याबरोबरच लतादीदींनीच गायलेलं ‘ओ पवन वेग से उड़ने वाले घोड़े’ ही दोन गाणी आपल्याला आवडत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

ज्योती कलश छलके

ओ पवन वेग से उड़ने वाले घोड़े

ममता बॅनर्जी दरवर्षी मला कुर्ते भेट देतात

या मुलाखतीदरम्यान मोदी म्हणाले ‘विरोधी पक्षांचे अनेक नेते माझे चांगले मित्र असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अजूनही दरवर्षी मला कुर्ते भेट देतात’, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. मोदींच्या या खुलाशामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

केवळ साडेतीन तास झोपतात मोदी

देशाचे पंतप्रधान होणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या देशाचे पंतप्रधान असलेले मोदी नक्की किती तास झोपतात याबाबत नक्कीच सामान्य माणसाला कुतूहल असेल. या प्रश्नाचे देखील उत्तर या मुलाखतीदरम्यान मोदींनी दिले. याबाबत बोलताना मोदी म्हणाले, मी खूप कमी वेळ झोपतो. मी केवळ साडे तीन तास झोप घेतो. यावेळी बोलताना जबाबदारी हेच जीवन असल्याचे ते म्हणाले.

एकटेपणाची सवय झालीय !

‘ऐन तारुण्यातच मी घर सोडलं होतं. त्या वयात घर सोडल्याचा मला त्रासही झाला, पण आता एकटं राहायची सवय झालीय. अनेक वर्षं एकटा राहत असल्यामुळे कदाचित ते अंगवळणी पडलंय. आईला मी काही दिवस इथं दिल्लीत राहायला बोलावलंही होतं. पण तिचं मन रमलं नाही. त्यामुळं ती परत घरी गेली, असंही त्यांनी सांगितलं.