नरेंद्र मोदी अंबानींच्या मध्यस्थाप्रमाणे काम करत होते : राहूल गांधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राफेलमध्ये घोटाळा झाला असून यासंदर्भात एक ई-मेल समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या मध्यस्थाची भूमिका केल्याचा आरोप केला आहे. तसेच अनिल अंबानी यांनीच फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना याची राफेल व्यवहाराची माहिती दिली होती. याची माहिती एचएएल, संरक्षण मंत्री किंवा विदेश सचिवालाही नव्हती. या प्रकरणात आधी भ्रष्टाचाराचा प्रकार होता, मात्र आता ऑफिशियल सिक्रेट अक्टचा भंग केल्याचे दिसते. असा आरोप राहूल गांधी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

राहूल गांधी यांनी राफेल व्यवहारासंदर्भात कॅगच्या अहवालावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, कॅग ही चौकीदार ऑडिटर जनरल आहे. पंतप्रधान भ्रष्ट आहेत हे कॅगच्या अहवालावरून स्पष्ट होते. नरेंद्र मोदींना सर्व काही माहित होते. त्यांनीच अंबानींना मदत केली. ज्या राफेल खरेदी व्यवहारासंदर्भात संरक्षणमंत्री किंवा अन्य कोणत्या अधिकाऱ्याला माहिती नसते परंतु ती अंबानींना कशी समजते. अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या व्यवहाराबद्दल सांगितले आहे. मी मोदींना म्हणतो की माझी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांची अनेकदा चौकशी करा. परंतु राफेल प्रकरणाचीही चौकशी करा, त्यासाठी संयुक्त चौकशी समिती गठीत करा. परंतु असं का करत नाहीत. राहूल गांधी म्हणाले की भ्रष्टाचार, प्रोसीजरल आणि सीक्रटे एक्टचा भंग केल्याचा हा सर्व प्रकार आहे. या तीनही प्रकरणात कोणीही वाचणार नाही.

You might also like