NASA चा इशारा, पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये होतोय धोकादायक बदल !

नवी दिल्ली : पृथ्वीच्या आत सध्या अतिशय धोकादायक बदल होत आहेत. जमीनीच्या एका मोठ्या भागात पृथ्वीची चुंबकीय शक्ती कमजोर झाली आहे. ही इतकी कमजोर झाली आहे की, जर याच्यावरून एखादे विमान गेले तर त्याच्याशी संपर्क साधण्यात अडचणीे येऊ शकतात. अखेर ही समस्या काय आहे आणि कशी आली, ते जाणून घेवूयात.

पृथ्वीच्या एका मोठ्या भागात चुंबकीय शक्ती कमजोर झाली आहे. हा भाग सुमारे 10 हजार किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. या भागात 3000 किलोमीटर खाली पृथ्वीच्या आऊटर कोरपर्यंत चुंबकीय क्षेत्राची शक्ती कमी झाली आहे.

अफ्रीकापासून दक्षिण अमेरिकापर्यंत सुमारे 10 हजार किलोमीटरच्या अंतरात पृथ्वीच्या आत मॅग्नेटिक फील्डची ताकद कमी झाली आहे. सामान्यपणे ही 32 हजार नॅनोटेस्ला असते. परंतु, 1970 ते 2020 पर्यंत ही कमी होऊन 24 हजार ते 22 हजार नॅनोटेस्लापर्यंत पोहचली आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन एजन्सी नासाने ही माहिती दिली आहे. पृथ्वीच्या या भागात चुंबकीय क्षेत्रात कमजोरी आल्याने या भागाच्या वर तैनात सॅटेलाइट्स आणि उडणार्‍या विमानांशी संपर्क करणे अवघड होऊ शकते.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मागील 200 वर्षात पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीत 9 टक्के घट झाली आहे. परंतु, अफ्रीका ते दक्षिण अमेरिकापर्यंत चुंबकीय शक्तीत जास्त घट आढळून आली आहे. सायंटीस्ट यास साऊथ अटलांटिक एनोमली म्हणतात.

पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळे आपला अंतराळातून येणार्‍या रेडीएशनपासून बचाव होतो. याच शक्तीच्या आधारावर सर्वप्रकारची संपर्क प्रणाली जसेकी सॅटेलाइट, मोबाइल, चॅनल इत्यादी काम करत आहेत.

पृथ्वीच्या आत वितळलेल्या तप्त लोखंडाचा वाहता समुद्र आहे. हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 3000 किलोमीटर खाली असतो. तो सतत फिरत असतो. याच्या फिरण्याने आतून इलेक्ट्रिकल करंट तयार होतो, जो वर येता-येता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये बदलतो.

संशोधनानुसार, पृथ्वीचा मॅग्नेटिक नॉर्थ पोल आपली जागा बदलत आहे. हा पोल कॅनडापासून सैबेरियाकडे जात आहे. हे त्याच तप्त वितळलेल्या लोखंडामुळे होत आहे.

अफ्रीकापासून अमेरिकापर्यंतच्या भागात जी मॅग्नेटिक फील्डची कमतरता आली आहे, त्यामुळे या भागात चुंबकीय सुरक्षा लेयर कमजोर झाली आहे. म्हणजे या भागात अंतराळातून येणार्‍या रेडिएशनचा परिणाम जास्त होऊ शकतो.

जर्मन रिसर्च सेंटरचे संशोधक जर्गेन मात्ज्का यांनी सांगितले की, मागील काही दशकात अफ्रीकापासून दक्षिण अमेरिकापर्यंतच्या परिसरात चुंबकीय शक्ती वेगाने कमी होत आहे.

जर्गेन म्हणाले, आता सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की, पृथ्वीच्या केंद्रात होत असलेल्या बदलामुळे किती मोठा बदल होईल. यामुळे पृथ्वीवर एखादे मोठे संकट येऊ शकते का, याचा शोध संशोधक घेत आहेत. सामान्यपणे पृथ्वीची चुंबकीय शक्ती 2.50 लाख वर्षांत बदलते. परंतु, अजून यात अनेक वर्ष शिल्लक आहेत.